प्रतिनिधी – अतुल काळे
- वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात आयटीतील नव्या संधी या विषयावर चर्चासत्र
सांगली/तासगाव : संगणकातील बेसिक गोष्टी आत्मसात करून संगणकातील मूलभूत तंत्रज्ञानाचा अभ्यास आवश्यक आहे असे उद्गार जॉन डियर कंपनीचे टीम लिडर हर्षवर्धन हुजरे यांनी पद्मभूषण डॉ.वसंतरावदादा पाटील महाविद्यालय तासगाव येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, बीसीए व संगणक शास्त्र विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या एक दिवसीय चर्चासत्रात बोलताना काढले. ते पुढे म्हणाले सी,सी-प्लस प्लस,लिनक्स या संगणकीय भाषा आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) काळातही खूपच महत्त्वाच्या आहेत ते सोदाहरण स्पष्ट करून सांगितले.इंडस्ट्रीमध्ये सॉफ्ट स्किल्स ,कम्युनिकेशन स्किल्स गरजेचे असल्याने ते विद्यार्थ्यांनी आत्मसात करण्याचे आवाहन त्यांनी केले.
या चर्चासत्रात बोलताना जॉन डिअर कंपनीतील सहकारी आणि महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री.विनायक माळी यांनी मी कसा घडलो हे सांगून १९६८ पासून संगणकाचे बदलते स्वरूप विविध उदाहरणाच्या माध्यमातून पटवून दिले. कॉम्प्युटर सायन्स आणि बीसीए च्या विद्यार्थ्यांनी संगणकाच्या भाषांचा अभ्यास करून संवाद कौशल्य आत्मसात करण्याचे आवाहन केले.या चर्चासत्रात विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची सखोल उत्तरे तज्ञांकडून देण्यात आली.
अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे यांनी विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम आणि इंडस्ट्री यांच्यामध्ये कसा समतोल राखला पाहिजे याबद्दल मार्गदर्शन केले.कॉम्प्युटर सायन्स व बीसीए विभागाने हे चर्चासत्र आयोजित केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभाग प्रमुख प्रा.व्ही.टी.कुंभार यांनी केले तर आभार प्रा.श्रुतिका जाधव यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.स्वाती पाटील यांनी मानले.कार्यक्रमाला गणितशास्त्र विभाग प्रमुख प्रा.प्रभाकर पाटील,प्रा.ए.ए.वाघ, प्रा.जे.एच.लावंड,प्रा.एन.व्ही. कुंभार,प्रा.आण्णासाहेब बागल यांसह महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.