राष्ट्रीय मतदार दिना निमित्त वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात रांगोळी स्पर्धा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी – अतुल काळे

  • मतदार राजा जागा हो : प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे

सांगली/तासगाव : राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधत तासगावच्या पीडीव्हीपी महाविद्यालयामध्ये रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते तर शहरातून जनजागृती फेरीच्या माध्यमातून मतदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले.
लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांनी मतदान केले पाहिजे. मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो असे उद्गार प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे यांनी पद्मभूषण डॉ.वसंतरावदादा पाटील महाविद्यालय तासगाव येथे मतदार दिनानिमित्त आयोजित केलेल्या रांगोळी स्पर्धेची पाहाणी करताना काढले. ते पुढे म्हणाले, आजही अनेक लोकांच्या मनात मतदाना विषयी निराशा आहे. माझ्या एका मताने काय फरक पडणार आहे? असे विचार मनात येतात. मतदानाचा दिवस सुट्टी म्हणून एन्जॉय करतात. त्यामुळे लोकशाहीचे खूप मोठे नुकसान होत आहे. घटनेने आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आहे तो आपण बजावला पाहिजे आणि लोकशाहीला मजबुती आणण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. महाविद्यालयातील तरुणांना मतदान करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती या विषयावर आपल्या कल्पकतेने विविध प्रकारच्या रांगोळी काढून लोकांनी मतदानाचा अधिकार बजावण्याचे आवाहन केले. १६ व्या राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून मतदार जागृतीची प्रतिज्ञा करून शपथ घेतली. मतदान जागृतीसाठी तासगाव शहरातून भव्य रॅलीचे ओयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नोडल अधिकारी डॉ.साईनाथ घोगरे यांनी केले. तर आभार राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.नितीन गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.आण्णासाहेब बागल यांनी केले.कार्यक्रमाला समाजशास्त्र विभाग प्रमुख कॅप्टन डॉ.विनोदकुमार कुंभार ,डॉ.पी.बी.तेली, डॉ.अमित माळी,डॉ.विलास साळुंखे,प्रा.सविता कोळेकर, प्रा.पुजा बुवा यांसह महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी विद्यार्थिनी , स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें