सिंधुदुर्ग-विवेक परब
जेम्स महाराष्ट्र, सिंधुदुर्ग ख्रिश्चन शांतता समिती, ह्यूमन राईट असोसिएशन फाॅर प्रोटेक्शन, कणकवली रिक्षा स्टॅन्ड क्रमांक एक, कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या रिक्षाचालकांची मुले इंजिनियर, डॉक्टर, वकील, किंवा आयटी सेक्टर, आयआयटीएन, नेव्ही, मिलेक्ट्री, सीए किंवा उच्च पदावर कार्यरत आहेत. अशा रिक्षा चालकांचा व तीस वर्षापेक्षा जास्त रिक्षा सेवा करत आहेत. अशा ज्येष्ठ रिक्षा चालकांचा सत्कार 25 जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता कणकवली येथील गोपुरी आश्रम पर्यटन निवास केंद्र वागदे येथे करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला अध्यक्ष उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजयकुमार काळे, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा विशेष शाखा सिंधुदुर्गचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक पराग मातोंडकर, महामार्ग सुरक्षा पथक कणकवली पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे, जेम्स महाराष्ट्र झोनचे अधीक्षक रेव्ह संजय पन्हाळकर, कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे कार्याध्यक्ष तथा ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे सहसचिव सुधीर पराडकर, वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अधिकारी विलास बगडे, जेम्स कोकण कम्युनिटी केअर वर्कर्सचे अमित पोवार तसेच ख्रिश्चन शांतता समितीचे अनंत चौगुले, ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष सुधीर धुरी. तरी या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व रिक्षा चालक मालक यांनी यांनी उपस्थित रहावे.असे आवाहन अमित पोवार, संतोष नाईक, सुधीर पराडकर, मंगेश सावंत, मिलिंद सावंत, शरद साटम, रविकांत चांदोसकर, सचिन तळेकर, महेंद्र सावंत, सुनील पाताडे, राजेश बांदेकर, संदीप सावंत, एकनाथ राऊळ, राजकुमार तळेकर, रवी माने, यांनी केले आहे.