प्रतिनिधी – अतुल काळे सांगली/ तासगाव :

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी – अतुल काळे

सांगली/ तासगाव : हिंदू धर्मासाठी प्राणाचे बलिदान दिलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनी म्हणजेच फाल्गुन अमावस्येला तासगाव शहरातून मुकपदयात्रा काढण्यात आली. हिंदुस्तान शिवप्रतिष्ठान कडून या मुकपदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने धारकरी यामध्ये सामील झाले होते. शनिवार दिनांक 29 रोजी सायंकाळी 5:30 वाजता तासगावातील शिवतीर्थ येथून मुकपदयात्रेस सुरुवात झाली. गणपती मंदिर, पोस्ट ऑफिस, सिद्धेश्वर चौक, वंदे मातरम चौक, एसटी स्टँड चौक ते शिवतीर्थया मार्गे पदयात्रा पार पडली. हिंदू धर्मासाठी संभाजी राजांनी दिव्य बलिदान केले. त्यांच्या कार्याला श्रद्धांजली वाहून देव- देश- धर्मासाठी कटीबद्ध राहण्याची शपथ धारकऱ्यांनी घेतली.

Leave a Comment

और पढ़ें