प्रतिनिधी – अतुल काळे
- वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात ‘जागतिक ग्राहक दिन’ साजरा
सांगली/तासगाव : ‘ग्राहक हा राजा आहे’ त्याने बाजारपेठेतही राजा म्हणूनच वावरावे.आपले अधिकार जाणून घ्यावेत. ग्राहकांनी आपल्या हक्कासाठी सजग राहावे असे उद्गार वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.अमोल सोनवले यांनी पद्मभूषण डॉ.वसंतरावदादा पाटील महाविद्यालय तासगाव येथे १५ मार्च जागतिक ग्राहक दिनाच्या कार्यक्रमात बोलताना काढले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. डॉ.सोनवले पुढे म्हणाले वस्तूची गुणवत्ता,शुद्धता,किंमत,प्रमाण पाहण्याचा हक्क ग्राहकाला आहे.ग्राहकांनी कोणतीही वस्तू खरेदी करताना त्या वस्तूची पावती घ्यावी.ऑनलाइन खरेदी करताना अधिकृत साईटवरूनच खरेदी करावी अन्यथा आपली फसवणूक होऊ शकते.फसव्या जाहिराती पासून सावध राहावे,वस्तू खरेदी करताना त्याची एक्सपायरी डेट पहावी.आपली फसवणूक झाल्यास ग्राहक मंचाकडे तक्रार करण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थांना केले.ग्राहक दिनाचे औचित साधून वाणिज्य विभागाने प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन केले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना ज्युनिअर प्रमुख एस.डी.पाटील यांनी जागतिक ग्राहक दिनाची माहिती देवून समाजात ग्राहकांची फसवणूक कशी होते हे उदाहरणे देवून सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.एस.व्ही.माळी यांनी केले तर आभार प्रा.फिरोज वलांडकर यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.आण्णासाहेब बागल यांनी केले. कार्यक्रमाला डॉ. अमित माळी, प्रा.बी.एल.माने, प्रा.ए.एस. निंबाळकर,प्रा.एस.पी. कोळपकर,प्रा.ए.एन.पाटील यांसह महाविद्यालयातील सर्व विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.