शक्तीपीठ महामार्गाचे स्वप्न बाळगलेल्या राज्य सरकारच्या नावाने बोंबाबोंब करत होळी साजरी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी – अतुल काळे

  • शेतकरी बचाव कृती समिती कडून महामार्गाची प्रतिमा दहन
  • शेतकऱ्यांचा विरोध सरकारपर्यंत पोहोचण्यासाठी शिमगा

सांगली/ तासगाव : राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्ग योजनेला विरोध करताना शक्तीपीठ महामार्ग शेतकरी बचाव कृती समितीच्या वतीने सरकारच्या भूमिकेत विरोधात शिमगा करण्यात आला असून यावेळी शक्तीपीठ महामार्ग नकाशा प्रतिमेचे दहन करण्यात आले.
महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला शक्तिपीठ महामार्ग सांगली जिल्ह्यातून हद्दपार व्हावा. या महामार्गाला कडाडून विरोध केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून गुरुवार दि. 13 रोजी होळी सणाच्या निमित्ताने विरोध दर्शविला गेला. राज्यातील महायुती सरकार, घटक पक्ष असलेले भाजप ,राष्ट्रवादी, शिवसेना तसेच राज्याचे मुख्यमंत्री यांच्या नावे बोंब ठोकण्यात आली. यावेळी उमेश देशमुख, महेश खराडे, उमेश एडके, प्रवीण पाटील, यशवंत हारुगडे, प्रभाकर तोडकर, रघुनाथ पाटील, विलास थोरात, सुधाकर पाटील सुनील शिंदे, विक्रम हारुगडे, अधिक पाटील, संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें