विद्यार्थ्यांनी संख्याशास्त्र विषयातून करिअर करावे – सीईओ कौस्तुभ गावडे

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी – अतुल काळे

  • वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात संख्याशास्त्र विषयाची एकदिवसीय कार्यशाळा

सांगली/तासगाव : जीवनात यशस्वी होण्यासाठी संख्याशास्त्राचे ज्ञान आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी संख्याशास्त्र विषयातून चांगले करिअर करावे असे उद्गार श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी पद्मभूषण डॉ.वसंतरावदादा पाटील महाविद्यालय तासगाव येथे शिवाजी युनिव्हर्सिटी स्टॅटिस्टिकल टीचर असोसिएशन (सुस्टा) आणि पी.डी.व्ही.पी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या एक दिवसीय कार्यशाळा स्टॅटिस्टीकल इनसाईट : एक्सप्लोरीग प्रॅक्टीकल ॲप्लीकेशन्स ॲण्ड करीयर प्रोस्पेक्ट्स या विषयावर बोलताना काढले.ते पुढे म्हणाले विद्यार्थ्यांनी करिअर निश्चित करावे मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी हार्ड वर्क करण्याचे आवाहन त्यांनी केले.तुम्ही जे ज्ञान प्राप्त करता त्या ज्ञानाचा समाजासाठी कसा वापर करता येईल यावर विचार मंथन केले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे यांनी शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांच्या स्वप्नातील सुसंस्कारी विद्यार्थी घडविण्यासाठी महाविद्यालयात राबवत असलेले उपक्रम सांगितले. विद्यार्थ्यांमधील दैवत्व ओळखून त्यांच्या अंगभूत कला कौशल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही कटीबध्द असल्याचे सांगून विद्यार्थ्यांना यश प्राप्तीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे सर यांना शिवाजी विद्यापीठाच्या आजी माजी विद्यार्थी कृती समितीच्या वतीने दिला जाणारा ‘शिवसंस्कार पुरस्कार’ मिळाल्याबद्दल प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे यांनी महाविद्यालयाच्या व संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार केला.
सकाळच्या उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक विभाग प्रमुख प्रा.प्रगती जाधव यांनी केले तर आभार प्रा. शंकर माने यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.आण्णासाहेब बागल, डॉ.एस.एस.परचुरे आणि कु. श्रेया पाटील यांनी केले. प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य प्रो. (डॉ.)एम.के.पाटील, सुस्टाचे प्रेसिडेंट प्रो.(डॉ.) एस.बी.महाडीक, डॉ.सोमनाथ पवार, डॉ.डी.एस.जाधव, प्रा.व्ही.व्ही.बागणे, डॉ.पी.आर.चव्हाण, प्रा. दत्तात्रय नलवडे,प्रा.ए.व्ही.पोवार ,सांगली जिल्हा सुस्टा प्रेसिडेंट प्रा.डी.एन.कलिंगे यांनी विद्यार्थ्यांमध्ये जाणीव जागृती करण्याचे काम केले.दिवसभरात पाच सत्रामध्ये ही कार्यशाळा संपन्न झाली.समारोप समारंभात विद्यार्थ्यांनी कु. प्रणाली चव्हाण आणि कु. दिक्षा गरड यांनी मनोगत व्यक्त केली.विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.या कार्यक्रमाला सांगली विभाग प्रमुख प्राचार्य प्रकाश हाके,नॅक समन्वयक प्रो.(डॉ.)जीवन घोडके,उपप्राचार्य जे.ए.यादव व प्रो.डॉ.नरेंद्र कुलकर्णी, प्रा.व्ही.एच.पाटील, प्रा. प्रभाकर पाटील, प्रा.एस.एस. पानारी,प्रा.एम.जे.फडतरे, प्रा.पी.आर. झांबरे यांसह महाविद्यालयातील विविध विभागाचे विभागप्रमुख,प्राध्यापक, सांगली जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातून आलेले विद्यार्थी – विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें