मराठी साहित्यातून संस्कृतीचे दर्शन घडते – प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी – अतुल काळे

  • वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात ‘जागर माय मराठीचा’

सांगली/तासगाव : मातृभाषेतून आकलन सर्वात चांगले होते.मराठी भाषेचा अभिमान बाळगा.मराठी साहित्यातून संस्कृतीचे दर्शन घडते असे उद्गार श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अर्थसहसचिव प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे यांनी पद्मभूषण डॉ.वसंतरावदादा पाटील महाविद्यालय तासगाव येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि मराठी विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या ‘जागर माय मराठीचा’ या कार्यक्रमात बोलताना काढले २७ फेब्रुवारी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी राजभाषा दिन व माजी विद्यार्थी मेळावा महाविद्यालयात आयोजित केला होता यावेळी गायक ओंकार धुमाळ यांच्या मराठी भावगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्राचार्य पुढे म्हणाले मराठी भाषेचा अभिमान बाळगा. समृद्ध मराठी भाषेची जपणूक करा. म्हणी ,बोलीभाषा ,मराठी शब्द संग्रह वाढवून लोकसंस्कृती टिकवण्यासाठी प्रयत्नशील .राहण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.यावेळी डॉ.पी.बी.तेली व सहकाऱ्यांनी संपादित केलेल्या यांनी पुस्तकाचे प्रकाशन पाहुण्यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
ओंकार धुमाळ यांच्या भावगीतांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.यावेळी प्रा.बी.एल.माने यांनी लोकसाहित्यातून लोकसंस्कृती कशी घडत गेली हे आपल्या गीतातून सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ. शहाजी पाटील यांनी केले तर आभार डॉ.रामा रोकडे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.तातोबा बदामे व प्रा.आण्णासाहेब बागल यांनी केले.कार्यक्रमाला नॅक समन्वयक डॉ.जीवन घोडके, उपप्राचार्य जे.ए.यादव व डॉ.नरेंद्र कुलकर्णी, ज्युनिअर विभाग प्रमुख एस.डी.पाटील यांसह महाविद्यालयातील प्राध्यापक,विद्यार्थी – विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें