सांगली कडेगांव न्युज: रिपोर्टर हेमंत व्यास
- कडेपुर येथे पक्ष संघटन बैठक संपन्न.
भारतीय जनता पक्षाकडून मागील काही दिवसांपासून सदस्य नोंदणी मोहीम राबविण्यात येत आहे. राज्यामध्ये सांगली जिल्ह्यासह पलुस – कडेगाव तालुका अग्रेसर आहे. पुढील काळामध्ये जिल्ह्यामध्ये पलुस – कडेगाव तालुका सर्वात पुढे असेल, असे प्रतिपादन पृथ्वीराज देशमुख यांनी कडेपुर येथे पक्ष संघटन बैठकीमध्ये केले.यावेळी सभासद नोंदणी केलेल्या कार्यकर्ते व बूथ प्रमुखांचा सत्कार मा. आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्याहस्ते गुलाबपुष्प व सन्मानपत्र देऊन सत्कार केला.
यावेळी बोलताना पृथ्वीराज देशमुख म्हणाले, भारतीय जनता पक्षाकडून पक्ष वाढीसाठी सदस्य नोंदणीची मोहीम राबवली जात आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. या पक्षामध्ये पक्ष वाढीसाठी कष्ट केलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यांचा सन्मान केला जातो. कार्यकर्त्यांचा प्रयत्नांमुळे जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढली आहे.
पक्षाने ज्यावेळी मला पक्ष वाढीची जबाबदारी दिली त्यावेळी जिल्ह्यातील सर्व नेत्यांशी समन्वय साधत सर्वांमध्ये एकवाक्यता ठेवत सर्व सहकार्यांच्या आणि कार्यकर्ते यांच्या जोरावर पक्ष जिल्ह्यामध्ये एक नंबरला आणला जिल्हा परिषद पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्था या सर्व ठिकाणी भाजपची सत्ता आणली. आगामी काळातही येवू घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कार्यकर्तात्यांच्या जोरावर ताकदीने लढवू आणि जिंकू असा निर्धार माजी आमदार व माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी दत्तात्रय सूर्यवंशी (शेठ), विजय करांडे, लक्ष्मण कणसे , बाबासाहेब शिंदे, महेंद्र पवार, अंकुश यादव, प्रकाश गढळे, अनिल यादव,शाहीर यादव, नेताजी यादव, मा. जि.प. सदस्य तुकाराम होवाळ, मा. सभापती मंदाताई करांडे, मा. सभापती मंगलताई शिरसागर, मा. उपसभापती रविन्द्र कांबळे, हणमंत थोरात, लक्ष्मण शिंदे, रायगावच्या सरपंच अर्चना घाडगे यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.