साळुंखे महिला महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी – अतुल काळे

सांगली/तासगाव : येथील संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. मराठी भाषा गौरव दिन हा लेखक कवी कुसुमाग्रज वि.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस हा मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते कुसुमाग्रज यांच्या जीवन कार्यावर आधारित निकिता शहा व वैष्णवी जगताप यांनी केलेल्या भितीपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविकातून स्नेहल पाटील यांनी कार्यक्रमाचा उद्देश व रूपरेषा स्पष्ट केली. मान्यवरांच्या हस्ते तात्यासाहेब वि.वा.शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात आले. अंजली परमणे यांनी संत चोखामेळा यांच्या अभंगाचे सुस्वर गायन केले. आलिशा नदाफ, निकिता शहा व नलिनी निकम यांनी काव्यवाचन सादर केले. स्नेहल पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘स्त्री-पुरुष समानता’ या विषयावर आधारित पथनाट्य सादर केले.त्यानंतर विद्यार्थिनींना गुगल लिंक मोबाईलवर पाठवून मराठी भाषा गौरव दिनासंबंधी प्रश्नमंजुषा कार्यक्रम ऑनलाईन घेण्यात आला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एम.पाटील यांनी अध्यक्षीय मनोगतातून मराठी भाषेला अभिजात दर्जा विषयीची माहिती सांगितली. त्यांनी सांगितले की,”मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. मराठी भाषेचे भारतीय ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशामध्ये असलेले स्थान यामुळे अधोरेखित झाले आहे.प्रा.रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने मराठी भाषा ही अडीच हजार वर्षांपूर्वीची जुनी असल्याचे पुरावे सादर केले. त्यामुळे हा दर्जा प्राप्त झालेला आहे”. सूत्रसंचालन अर्चना दळवी आणि राजश्री टोपकर यांनी तर प्रा.डॉ.एम.एस.उभाळे यांनी आभार अभिव्यक्ती केली.
कार्यक्रमाचे नियोजन प्रा.डॉ.लक्ष्मी भंडारे यांनी केले. तर प्रा.डॉ.एम.एस. उभाळे, प्रा.डॉ.अर्चना चिखलीकर, प्रा.डॉ.डी.टी.खजूरकर, प्रा.ए.आर. पंडित,प्रा.पी.एस.शेंडगे,प्रा.ग्रंथपाल ए.जी.पाटील, श्री सुनील कुंभार,सुजाता हजारे व हनुमंत वाघमारे यांनी सहकार्य केले.

Leave a Comment

और पढ़ें