मराठी भाषा संवर्धन ही काळाची गरज – प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी – अतुल काळे

सांगली/तासगाव : मराठी भाषेत एक नावीन्य आहे.ती व्यक्तिमत्व विकासाचे साधन आहे.मराठी भाषा संवर्धन करणे ही काळाची गरज आहे.मराठी ही ज्ञानभाषा होण्यासाठी सर्वांनी भाषेची सेवा केली पाहिजे.ही भाषा प्रादेशिक न राहता राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे.असे मत प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे यांनी व्यक्त केले.ते तासगाव येथील पद्मभूषण डॉ.वसंतराव दादा पाटील महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने आयोजित मराठी राजभाषा गौरव दिन व कुसुमाग्रज जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

या प्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. मिलिंद हूजरे म्हणाले, मराठी ही आपली मातृभाषा आहे. आज अन्य भाषांना मराठीने आपल्यात सामावून घेतले आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी समाजातील प्रत्येकाने आपले योगदान दिले पाहिजे.आधुनिक काळात कृत्रिम बुध्दीमतेचा (AI) मोठ्या प्रमाणात वापर होत आहे त्याचा वापर करून मराठी भाषेचा विकास केला पाहिजे.भाषेच्या संवर्धना बरोबर अन्य भाषांमधील ज्ञान मराठी भाषेत आणून मराठी भाषा एक सशक्त ज्ञानभाषा बनविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

यावेळी मराठी विभागप्रमुख डॉ.शहाजी पाटील यांनी मराठी भाषेचा इतिहास व परंपरा स्पष्ट केली व कविवर्य कुसुमाग्रज यांच्या साहित्यिक कार्याचा आढावा घेतला.
यावेळी विद्यार्थ्यांनी कविवर्य कुसुमाग्रज यांचे जीवन,वाड:मयीन कार्य व अभिजात मराठी भाषा याविषयी भित्तीपत्रिकेचे आयोजन केले होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तातोबा बदामे यांनी केले आभार डॉ.रामा रोकडे यांनी मानले.
कार्यक्रमास महाविद्यालयाचे उप प्राचार्य प्रा.जे.ए .यादव , प्रा.डॉ.तातोबा बदामे , डॉ. दत्तात्रय थोरबोले, डॉ.साईनाथ घोगरे,डॉ.रामा रोकडे,डॉ.विशाल पाटील,डॉ.अमोल सोनवणे,प्रा.पल्लवी मिरजकर,प्रा. डॉ. अनिता मगदूम यांच्यासह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें