सिंधुदुर्ग(महाराष्ट्र) -विवेक परब
- 53 गरजू दिव्यांग व्यक्तींनी घेतला लाभ
3 डिसेंबर हा जागतिक दिव्यांग दिन म्हणून साजरा केला जातो या दिनाचे औचित्य साधून मातृत्ववरदान फाऊंडेशन च्या माध्यमातून सिंधुदुर्ग दिव्यांग संस्था आणि बँक ऑफ बडोदा च्या सहकार्याने दिव्यांग बांधवाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बँकिंग शिबीराचे मंगळवार दिनांक 3/12/2024 रोजी सकाळी 10.30 वाजता हॉटेल श्री महाराज येथे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या वेळी बँकिंग शिबीर कार्यक्रमाचे प्रमुख बँक ऑफ बडोदा शाखाधिकारी रोहन पाटील यांचा मातृत्ववरदान फाऊंडेशनच्या अध्यक्ष वैष्णवी मोंडकर तसेच सिंधुदुर्ग दिव्यांग संस्था अध्यक्ष सत्यम पाटील यांच्या माध्यमातून शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी मार्गदर्शन करताना रोहन पाटील म्हणाले की दिव्यांग बांधवाना अपंगत्व हे जन्मतः किंवा अपघाताने आले असते. त्यांच्या व्यावहारिक जीवनात या अपंगत्वामुळे अनेक सामाजिक आर्थिक अडचणींना सामोरं जावे लागत असते. परंतु खचुन नं जाता त्यांना आर्थिक सक्षमता प्राप्त होण्यासाठी तसेच आर्थिक स्तर उंचावण्यासाठी बँक आपल्या सोबत असून यात मुद्रा लोन, सिएमजीपी, पीएमजीपी, पर्यटन व्यवसाय वाढीसाठी आई योजना तसेच माध्यमातून शासनाच्या विविध कर्ज योजना त्यांची माहिती दिली तसेच बँक दिव्यांग बांधवाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सोबत असल्याचे सांगितले या कार्यक्रमाचे सूत्र संचालन संतोष गंगनाईक यांनी केले. नंदू देसाई, फॅनी फर्नाडिस, अध्यक्ष माय माउली संस्था रवींद्र खानविलकर, कार्याध्यक्ष तारकर्ली पर्यटन संस्था विष्णू मोंडकर, अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ यांनी आर्थिक सक्षमीकारणासाठी दिव्यांग बांधवानी काय करावे याविषयी मार्गदर्शन केले मातृत्ववरदान फाऊंडेशन तर्फे आयोजित आर्थिक सक्षमीकरण कार्यक्रमाचा 53 गरजू दिव्यांग व्यक्तींनी लाभ घेतला असून येणाऱ्या काळात दिव्यांग बांधवाना व्यवसाय उभा करण्यासाठी येणाऱ्या अडचणी, प्रकल्प अहवाल कागद पत्र जमा करण्यासाठीही तसेच दिव्यांग बांधवाच्या अडीअडचणी मध्ये मातृत्ववरदान फाऊंडेशन पुढील काळातही मदत केली जाणार असून आपल्या राहत्या भागात विविध व्यवसायांच्या माध्यमातून आर्थिक सक्षमता प्राप्त करण्यासाठी दिव्यांग बांधवाना मदत केली जाणार असल्याचे वैष्णवि मोंडकर अध्यक्ष मातृत्ववरदान फाऊंडेशन यांनी सांगितले उपस्थितांचे आभार सत्यम पाटील सिंधुदुर्ग दिव्यांग संस्था यांनी मांडले यावेळी दत्ता कामतेकर, मंगेश करलकर, प्रियांका मांजरेकर, संजय नार्वेकर संस्था प्रतिनिधी आणि मोठ्या प्रमाणात दिव्यांग बांधव उपस्थित होते.