रिपोर्ट: विवेक परब
सिंधुदुर्ग- ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन संघटना व सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तसेच एकदंत फूड अँड बेव्हरेजिस (ऑरबेलो) आणि स्पेक्टोमार्ट कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने कै.सौ.शिला शंतनू बांदिवडेकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून शुक्रवार दिनांक ४ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिर आणि मोफत नेत्र तपासणी व मार्गदर्शन शिबिर तसेच आरोग्य तपासणी शिबिर गडमठ- गावठणवाडी, तालुका वैभववाडी येथे आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिराला प्रमुख उपस्थिती म्हणून वैभववाडी तहसीलदार- सुर्यकांत पाटील, वैभववाडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक – सुनील अवसरमोल, वैभववाडी गटविकास अधिकारी- आर.डी.जंगले, ह्युमन राईट असोसिएशन फोर प्रोटेक्शनचे कोकण विभागीय अध्यक्ष- संतोष नाईक, महावितरण कणकवलीचे उपकार्यकारी अभियंता विलास बगडे, रक्तसिंधू मित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश तेंडूलकर, गडमठ सरपंच सौ. मालती शेटे, ह्युमन राईट असोसिएशन फोर प्रोटेक्शनचे जिल्हाध्यक्ष सुधिर धुरी, स्पेक्टो मार्टचे संचालक आणि ह्युमन राईट असोसिएशन फोर प्रोटेक्शनचे कणकवली तालुकाध्यक्ष मंगेश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी या भव्य रक्तदान शिबिर आणि मोफत नेत्र तपासणी व मार्गदर्शन शिबिर तसेच आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ गडमठ पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी घ्यावा असे आवाहन ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन संघटनेचे वैभववाडी तालुका उपाध्यक्ष प्रणव बांदिवडेकर यांनी केले आहे.