भविष्यामध्ये शिक्षकांपुढे मोठी आव्हाने- प्राचार्या सौ.शुभांगी गावडे

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी – अतुल काळे

सांगली/तासगाव:- “शिक्षकी पेशा ही एक समाजसेवा व देशसेवा आहे. शिक्षकाने उपक्रमशील असावे.विद्यार्थ्यांना उद्योगी बनवावे.ओझं वाटतं तिथे गोष्टी सोडून द्याव्यात.ज्या गोष्टी चुकीच्या आहेत तिथे विरोध करावा. काळानुसार आचार विचार बदलत असतात. त्यानुसार स्वतःमध्ये बदल करावा. 2030 पर्यंत संपूर्ण शैक्षणिक वातावरण बदलणार आहे. शिक्षकाची भूमिका सुद्धा बदलणार आहे. शिक्षक होणे ही भविष्यात कठीण बाब असणार आहे. त्यामुळे शिक्षकांसमोर भविष्यात मोठी आव्हाने असणार आहेत” असे प्रतिपादन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिव व प्राचार्या,सौ शुभांगी गावडे यांनी केले.त्या तासगाव येथील संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयात संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे आदर्शमाता पुरस्कार व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख वक्त्या व अध्यक्षा म्हणून उपस्थित होत्या.
मान्यवरांच्या हस्ते डॉ. बापूजी साळुंखे व संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांचे पुतळापूजन व अभिवादन करण्यात आले. गेल्या चार वर्षात प्रकाशित झालेल्या सात स्नेहकुंज कॉलेज वार्तापत्राचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमास सुरुवात झाली.
प्रास्ताविकातून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एम.पाटील यांनी महाविद्यालयात सुरू असलेल्या विविध उपक्रमांचे अहवाल वाचन केले. तसेच कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. मान्यवरांच्या स्वागतानंतर वर्षभरात विद्यार्थिनींनी विविध स्पर्धा, उपक्रम व परीक्षांमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल प्रमाणपत्र तसेच सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्रशासकीय सेवकांनी महाविद्यालयासाठी बी प्लस प्लस (B++) मानांकन मिळवण्यासाठी केलेले प्रयत्नांसाठी तसेच महाविद्यालयाचा विद्याविषयक दर्जा व प्रशासकीय विद्याविषयक दर्जा(AAA) तपासणीसाठी केलेल्या कार्यासाठी महाविद्यालयाकडून सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. बक्षीस वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.अर्चना चिखलीकर यांनी केले
संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे आदर्शमाता पुरस्कार महाविद्यालयातर्फे दरवर्षी दिला जातो. यावर्षी शैक्षणिक वर्ष 2023 व 2024 या दोन वर्षांचे पुरस्कार देण्यात आले. प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्या कुटुंबातील मातांनी आपल्या मुलींना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले, अशा आईंना आदर्शमाता पुरस्कार दिला जातो. शैक्षणिक वर्ष 2023 चा पुरस्कार विद्यापीठात चौथा क्रमांक आलेल्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी अजिता गायकवाड यांच्या आई सौ.नंदा बाबासो. गायकवाड यांना देण्यात आला. त्यांच्या मानपत्राचे वाचन प्रा.डॉ.एम.एस. उभाळे यांनी केले. तर शैक्षणिक वर्ष 2024 चा पुरस्कार महाविद्यालयात प्रथम आलेल्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी अनुराधा तपासे यांच्या आई सौ. माया तपासे यांना देण्यात आला. त्यांच्या मानपत्राचे वाचन प्रा.डॉ.देवदत्त खजूरकर यांनी केले. दोन्ही आदर्शमातांना माहेरची साडी, सन्मान चिन्ह व मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सत्कारमूर्ती सौ.नंदा गायकवाड यांनी आपले उत्स्फूर्त मनोगत सादर केले.यावेळी संस्थेचे सांगली विभाग प्रमुख मुख्याध्यापक श्री प्रकाश हाके यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून मनोगत सादर केले. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या प्राचार्या श्रीमती शुभांगी गावडे यांचा परिचय प्रा.अंकुश गायकवाड यांनी करून दिला. प्राचार्या सौ. शुभांगी गावडे यांनी अध्यक्षीय मनोगत सादर केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका लोहार व सुमेधा सुतार यांनी तर आभार अभिव्यक्ती प्रा.पी.ए.शेंडगे यांनी केली. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाचे नियोजनासाठी प्रा.डॉ.एम.एस.उभाळे, प्रा.डॉ.अर्चना चिखलीकर,प्रा.डॉ.लक्ष्मी भंडारे, प्रा.डॉ.डी.टी.खजूरकर, प्रा.ए.आर.पंडित,प्रा.पी.एस. शेंडगे, प्रा.ग्रंथपाल ए.जी. पाटील, श्री सुनील कुंभार, सुजाता हजारे व हनुमंत वाघमारे या सर्वांनी सहकार्य केले.

Leave a Comment

और पढ़ें