भारती शुगर्सची वाटचाल ही ऊस उत्पादक शेतकरी आणि वाहतूक कॉन्ट्रॅक्टर यांचा विश्वास संपादन करूनच : महेंद्र(आप्पा) लाड

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

रिपोर्ट: अतुल काले 

सांगली /तासगाव : भारती शुगर्स अँड फ्यूएल्स प्रा. लि.नागेवाडीच्या प्रशासनाने कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला आहे.
ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार, तोडणी मजूर व कारखान्यातील कामगार व कर्मचारी यांच्या सहकार्याने गळीत हंगाम यशस्वीरित्या पार पडला आहे. स्वर्गीय डॉ. पतंगराव कदम साहेब यांनी घालून दिलेल्या आदर्शा प्रमाणे व माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या मार्गदर्शनानुसार भारती शुगर्स कारखान्याची वाटचाल यापुढेही राहणार आहे असे प्रतिपादन सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मा.महेंद्र (आप्पा) लाड यांनी केले. कारखाना कार्यस्थळावर गळीत हंगामाच्या सांगता समारंभ प्रसंगी आयोजित केलेल्या तोडणी वाहतूक कॉन्ट्रॅक्टर यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी ते बोलत होते.

भारती शुगर्स अँड फ्युएल्स प्रा. लिमिटेड नागेवाडी कारखान्यात या गळीत हंगामात १,६८,२१० मे.टन उसाचे गाळप करून १,९३,४५० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. या हंगामात सरासरी साखर उतारा ११.५० % इतका मिळाला आहे. या गळीत हंगामात गळीतास आलेल्या उसाचे ३१ जानेवारी अखेरचे ऊस बिल संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले आहे. गळीत हंगाम सांगता प्रसंगी कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर. डी. पाटील व सर्व खाते प्रमुख, विभाग प्रमुख यांच्या उपस्थितीत प्रथम वजन काटे व गव्हाणीचे विधिवत पूजन करण्यात आले. उपस्थित तोडणी वाहतूक कंत्राटदार, वाहन मालक, सर्वाधिक ऊस वाहतूक केलेल्या मुकादम व तोडणी मजुरांचा महेंद्र (आप्पा) लाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
स्वागत व प्रास्ताविक कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी संजय मोहिते यांनी केले.
यावेळी कारखान्याचे चिफ इंजिनियर एम. एस. पाटील, चिफ केमिस्ट विकास सूर्यवंशी, फायनान्स मॅनेजर प्रवीण पाटील , स्टोअर किपर अक्षय पाटील, एच. आर. असिस्टंट प्रसाद सुतार, परचेस असिस्टंट तुषार लाड , अविनाश स्वामी, सिव्हिल इंजिनीअर राजेंद्र गाडवे, ऊस पुरवठा अधिकारी जितेंद्र डुबल, सुजित मोरे, विशाल पाटील, अजय लाड, चांगाप्पा पांढरे, केनयार्ड सुपरवायजर सचिन पाटील, , केन अकौंटंट मधुकर रुपनर, ऊस तोडणी मुकादम राजेंद्र सावळा लेंगरे, अशोक उत्तम आंधळे, पांडुरंग गोविंद वनवे, रामगोंडा कामा करपे, संजय सावळा लेंगरे, विठ्ठल धोंडीबा वाघे,भगवान सावळा कटरे, पांडुरंग लक्ष्मण गंगणमाले आदिसह अधिकारी, कर्मचारी, तोडणी मजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कारखान्याचे सुरक्षा अधिकारी जी. डी. निकम यांनी सर्वांचे आभार मानले.

Leave a Comment

और पढ़ें