प्रतिनिधी – अतुल काळे
सांगली/तासगाव : शाळेची आठवण इतक्या वर्षांनंतर आजही येते, कारण शाळेमुळे आयुष्यात उभारण्याची संधी मिळाली. कसे वागावे, कसे बोलावे हे शाळेने शिकविले. वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात शाळेने दिलेल्या शिकवणी मुळे प्रगती करू शकलो. बालशाळा हे संस्काराचे केंद्रस्थान आणि संस्काराचे विद्यापीठ आहे. असे प्रतिपादन राधा गोविंद मराठे माजी विद्यार्थी सनदी लेखापाल (सी. ए.) अमेय जोशी यांनी केले. बाल शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
सांगली शिक्षण संस्थेच्या राधा गोविंद मराठे बालशाळा येथे प्रशालेचे माजी विदयार्थी अमेय जोशी यांनी आपले वडील कै.आनंदराव उर्फ गजानन जोशी यांचे स्मरणार्थ शाळेस सीसीटीव्ही कॅमेरे भेट दिले. या सीसीटीव्ही व स्क्रीनचे उद्घाटन करताना दिल्याबद्दल कृतज्ञता सोहळा संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून अमेय जोशी होते. त्यांच्या सुविध्य पत्नी सौंदर्यतज्ञ डॉ. धनश्री जोशी, माता श्रीमती आशा जोशी याही यावेळी उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना सांगली शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष रवींद्र देवधर म्हणाले, कृतज्ञता ही फक्त हृदयात असून चालणार नाही तर ती शब्दातून, कृतीतून वृत्तीतून आणि वर्तणुकीतून व्यक्त केली पाहिजे. या भावनेतून श्री अमेय जोशी यांनी आपले वडील इंजिनियर कै.आनंदराव उर्फ गजानन जोशी यांचे स्मरणार्थ केलेली सीसीटीव्ही कॅमेऱ्याची मदत मुलांसाठी आणि शाळेसाठी अत्यंत उपयुक्त आहे. कै. जोशी यांचेही सांगली शिक्षण संस्थेवर नितांत प्रेम होते. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत अमेय जोशी यांनी त्यांचा सामाजिक कार्याचा वसा पुढे चालवला आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सुभाष बल्लाळ यांनी केले. वैभव राव यांच्या आभार प्रदर्शन आणि कार्यक्रमाचे सांगता झाली. यावेळी संस्थेचे ब वर्गीय संचालक अरुण थोरात, शालाधिक्षक योगेश खाडीलकर, मुख्याध्यापक मुकुंद जोग, आनंदी गुरव, शाळेचे सर्व शिक्षक वृंद, सेवक उपस्थित होते.