सांगली /कडेगांव रिपोर्टर सुहास कराडकर.
कडेगाव नगरपंचायत च्या स्वीकृत नगरसेवक पदी काँग्रेस पक्षाचे श्री नामदेव विठोबा रासकर यांची एकमताने निवड करण्यात आली.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कडेगाव चे प्रांताधिकारी श्री रणजीत भोसले होते.कडेगाव नगरपंचायत चे स्वीकृत नगरसेवक श्री सिद्धिक पठाण यांनी राजीनामा दिलेने आज कडेगाव नगरपंचायत मध्ये स्वीकृत नगरसेवक ची निवड होती.
काँग्रेस पक्षाच्या वतीने काँग्रेस चे गटनेते श्री विजयराव शिंदे यांनी श्री नामदेव विठोबा रासकर यांची शिफारस केली होती. यावेळी कडेगावचे मुख्याधिकारी श्री म्हेत्रे प्रमुख उपस्थित होते. सदर निवडीप्रसंगी कडेगावचे नगराध्यक्ष श्री धनंजय देशमुख, उपनगराध्यक्ष अमोल डांगे,काँग्रेसचे गटनेते श्री विजयराव शिंदे, नगरसेवक मनोज मिसाळ, श्री सागर सकटे,संदिप काटकर, निलेश लंगडे,सौ सीमा जाधव,सौ छाया माळी,यांच्या सह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेशचंद्र थोरात, सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्री दीपकशेठ भोसले, सांगली जिल्हा काँग्रेस चे उपाध्यक्ष श्री आनंदाराव रासकर,कडेगाव चे माजी उपनगराध्यक्ष श्री राजू आप्पा जाधव, साजिद पाटील, सागर सूर्यवंशी, ज्येष्ठ नेते सुरेश देशमुख नाना,वैभव देसाई, अनिल वायदंडे,महेश जाधव, दादासाहेब माळी,आनंदाराव खरात,शिराज पटेल, असिफ तांबोळी,नीतीन शिंदे,दिनकर माळी, बजरंग माळी, वसंतराव रासकर,गजानन माळी, प्रदीप देसाई, राजेंद्र शिंदे,विकास शिंदे,सचिन कुलकर्णी, गणेश खरात,बाळासाहेब देसाई,सुरेश रासकर,सर्जेराव माळी, मोहन गायकवाड,अर्जुन चन्ने,चंद्रकांत रासकर यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. नामदेव रासकर यांचे आमदार डॉ विश्वजीत कदम, सागरेश्वर सहकारी सूतगिरणीचे अध्यक्ष शांतारामबापू कदम,भारती सहकारी बँकेचे संचालक युवा नेते डॉ जितेश भैय्या कदम यांनी अभिनंदन केले. आमचे नेते माजी मंत्री मा आमदार डॉ विश्वजित कदम साहेब व मा शांताराम बापू यांनी माझी निवड करून जो विश्वास टाकला आहे त्या विश्वासास पात्र राहून कडेगावचे विकासासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे नूतन नगरसेवक नामदेव रासकर यांनी सांगितले.