लाडक्या बहिणी संजयकाकांच्या पाठीशी राहतील : शिवानीताई पाटील
प्रतिनिधी -अतुल काळे
कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटमाथ्यावर झंजावाती प्रचार दौरा.
सांगली/तासगाव : महायुती सरकारनं महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी लाडकी बहीण योजना राबवली. मात्र ही योजना बंद होण्यासाठी विरोधकांनी केलेले प्रयत्न सगळ्यांच्या समोर आहेत. त्यामुळे महिलांसाठीच्या लाडकी बहीण सह बाकी योजनाही सक्षमपणे सुरू राहण्यासाठी तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघातील लाडक्या बहिणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार संजयकाका यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहतील असा ठाम विश्वास शिवानीताई प्रभाकर पाटील यांनी
व्यक्त केला.
महायुती व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटमाथ्यावर शिवानीताई प्रभाकर पाटील यांचा झंजावाती प्रचार दौरा. पार पडला. यामध्ये घाटनांद्रे,रायवाडी, शेळकेवाडी, आगळगाव,नरसिंहगाव या गावातील वृद्ध माता-भगिनींशी शिवानी पाटील यांनी संवाद साधला. व संजयकाकांनाच विजयी करण्याचे आवाहन केले.
यावेळी मतदारांशी संवाद साधताना शिवानी ताई पाटील म्हणाल्या, महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांनी खासदार म्हणून केलेले काम आपल्या सर्वांच्या समोर आहे. कवठेमंकाळ तालुक्यातले अनेक प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी काकांनी प्रयत्न केले
या मतदारसंघात केवळ सहानभूतीच राजकारण करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे मात्र कवठेमंकाळ व तसेच तालुक्यातील जनता सुज्ञ आहे त्यामुळे या मतदारसंघात निश्चित परिवर्तन होईल. व संजय का पाटील आमदार होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला
यावेळी बोलताना पाटील म्हणाल्या, मुलींचे उच्च शिक्षण मोफत करणे, एसटीचा प्रवासाचें तिकीट निम्मे करणे महिला व बालकांच्य सुदृढ आरोग्य साठी अनेक योजना या सरकारने राबवले आहेत. माहिती सरकारने लाडकी बहीण योजनेचे माध्यमातून आतापर्यंत साडेसात हजार रुपये आपल्या खात्यात जमा केले आहेत. कवठेमंकाळ मतदार संघातील तब्बल एक लाख सहा हजार महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. त्यामुळे या तालुक्यातील स्त्रीशक्ती संजय काकांच्या पाठीशी उभी राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.