Search
Close this search box.

परतीच्या अवकाळी पावसामुळे चिंदर परिसरातील शेतीचे मोठे नुकसान- शेतकरी चिंतेत

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सिंधुदुर्ग- विवेक परब

महसूल विभागाने पंचनामे करून शेतकरी वर्गांला दिलासा द्यावा

कोकणातील मालवण तालुक्यातील चिंदर गावातील परतीच्या पावसामुळे भात शेतीचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत, तीन महिने मेहनत करून हातातोंडाशी आलेली शेतीचे होणारे नुकसान बघून चिंदर परिसरातील शेतकरी चिंतेत दिसून येत आहेत. कृषी विभागाने याकडे त्वरीत लक्ष देणे गरजेचे आहे.
कोकणातील भातशेती हीच मुख्य शेती आहे, त्यामुळे आता भात कापणीला सुरुवात झाली आहे. दिवसभर भात कापून संध्याकाळी ते पावसाच्या भीतीने घरी आणावे लागते. त्यात संध्याकाळी पाऊस पडला की शेती सर्व भिजून जाते
प्रचंड पावसामुळे कापलेल्या आणि आडवे पडलेलं भात पिकांना कोंब येऊ लागल्याने शेतीकरीवर्ग हताश झाला आहे.
महसूल विभागाने पंचनामे करून शेतकरी वर्गांना दिलासा द्यावा. अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.

Leave a Comment

और पढ़ें