प्रतिनिधी -: सचिन मुतडक
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच १५ ऑगस्ट २०२४ हा दिवस कौठवाडी आणि पुरुषवाडी या गावांमधील लोकांची अनेक वर्षाची प्रतीक्षा व उत्कंठा लागलेल्या लाल परी ची प्रतीक्षा अखेर संपली.
अनेक वर्षापासून पुरुषवाडी व कौठवाडी या गावांमध्ये बस जाऊ शकतच नव्हती, या लाल परीसाठी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी पाठपुरावा देखील केला. परंतु रस्त्यान अभावी व काही तांत्रिक अडचणीमुळे या गावांमध्ये बस जाणे शक्य नसल्याकारणाने हे गाव ह्या लाल परी पासून वंचितच होते. त्या गावातील विद्यार्थ्यांना शाळेसाठी जाण्यासाठी दोन तीन किलोमीटरची पायपीट केल्यानंतर एसटी बस मिळत असे. परंतु यांच्या या प्रतीक्षेचे यश अकोले तालुक्याचे भाग्यविधाता कार्यसम्राट माननीय आमदार डॉक्टर किरणजी यामाजी लाहमटे साहेब, यांच्या विशेष प्रयत्नातून यशस्वी झाले. व कोठवाडी व पुरुषवाडी या गावांमध्ये लाल परीचे आगमन झाले. या लाल परीच्या आगमनाने या गावातील सर्व नागरिकांना खूप आनंद झाला. त्यापेक्षाही अतिशय आनंद हा येथील शाळेकरी मुलांना झाला. कारण त्यांची होणारी ही रोजची पायपिट आमदार डॉक्टर लाहमटे साहेब यांच्या प्रयत्नांत मुळे थांबली. व यांना राजूर पासून तर त्यांच्या घरापर्यंत लाल परीची व्यवस्था सुरू झाली. ह्या लाल परीचे या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर गावकऱ्यांनी स्वागत केले. व शाळेतील विद्यार्थ्यांनी नाचून आनंद साजरा केला. या लाल परि चे उद्घाटन कार्यसम्राट आमदार यांच्या सुविद्य पत्नी सौ, पुष्पाताई किरणजी लाहमटे ताई साहेबांनी १५ ऑगस्ट २०२४ रोजी साडेदहा वाजता पुरुष वाडी गावात केले त्यावेळी अकोले विभागाचे आगारप्रमुख एनटी गवळी साहेब, सचिन वाकचौरे साहेब, व राजुर विभागाचे देशमुख साहेब, तसेच अंकुश वैद्य, अक्षय आभाळे, पवार, मंडलिक, तांबोळी, वांजूळशेतचे सरपंच ताई पद्मिनी भांडकोळी, उपसरपंच तुकाराम कोंडार, सदस्य भाऊ कोंडार, मा, सदस्य गंगाराम कोंडार शिक्षक मच्छिंद्र देशमुख सर, विलास महाले सर, मावेशी सरपंच मारुती जाधव, भीमा कोंडार, सोमा कोंडार, तानाजी कोंडार, फसाबाई कोंडार,भांगरे मा. सरपंच शरद कोंडार मा.पोलीस पाटील मावशी मारुती जाधव, लताबाई कोंडार ताराबाई वाळेकर, अंकुश जाधव, व सामाजिक कार्यकर्ते रमेश लिंभे व दत्तात्रय चंद्रर कोंडर हे उपस्थित होते त्या सर्वांच्या प्रयत्नांना अखेर १५ ऑगस्ट २०२४ रोजी यश आले. व त्यांच्या गावांमध्ये लाल परीचे आगमन सुरू झाले. यामुळे या गावकऱ्यांनी संपूर्ण गावात हा आनंद उत्सव साजरा करत. कार्यसम्राट डॉक्टर किरणजी यमाजी लहामटे साहेब, यांचे खूप खूप आभार व्यक्त केले. व भावी आमदारकीसाठी खूप खूप शुभेच्छा देऊन सदैव त्यांच्या पाठीशी राहण्याचा शब्द देखील सामाजिक कार्यकर्ते यांनी दिला.