प्रतिनिधी – अतुल काळे
सांगली/ तासगाव : तासगाव कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरचंद्र पवार गटाचे उमेदवार रोहित आर आर आबा पाटील यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जाहीर पाठिंबा असल्याची घोषणा संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केली. तासगाव तालुक्यातील येळवी येथील प्रचार सभेमध्ये महेश खराडे यांनी ही आपली भूमिका स्पष्ट केली. संघटनेच्या या निर्णयाचे तासगाव आणि कवठेमहांकाळ या दोन्ही तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे. संघटनेचे निर्णयानुसार सांगली जिल्ह्यातील स्थानिक पातळीवर विधानसभा मतदार संघात संघटनेला पूरक विचार असणाऱ्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा देण्याची निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसारच तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघात रोहीत आर. पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला.