सांगली /कडेगांव .सुहास कराडकर की रिपोर्ट.
कडेगाव येथील मुख्य बाजारपेठेत शिवांश कलेक्शन या कापड दुकानात साडी खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानात घुसून चाकूचा धाक दाखवून २० ग्रॅम, ६१ हजार रुपये सोन्याची चैन,तीन ग्रॅम ४ हजार रूपये किमतीच्या २ सोन्याच्या अंगठ्या असा ६९ हजाराचे सोने लंपास करून पळ काढल्याची घटना. शनिवार दिं.२८/०९/२४ रोजी सकाळी साडे आठच्या सुमारास घडली आहे. फिर्यादी नामदेव कृष्णा करडे यांच्या फिर्यादीवरून तीन अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक संग्राम शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपनिरीक्षक प्रवीण जाधव,उदय काळे करीत आहेत.
घटनेचे वृत्त समजताच कडेगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आहे.वेगाने पोलिस चक्रे फिरवली आहेत.
मेन रोड बाजारपेठ येथील शिवास कलेक्शन या कपड्याच्या दुकानात तीन अनोळखी व्यक्तींनी साडी खरेदी करण्याचा बनाव करून फिर्यादी करडे यांचे हातपाय साडीने बांधून तोंडात गोळा घालून चाकूचा धाक दाखवून गळ्यातील चेन तोडून व हातातील अंगठ्या काढून तेथून पोबारा केला आहे.
सदरील प्रकरणी कडेगाव पोलिसात कलम-१९५/२०२४ बी.एन.एस.अन्वये कलम ३०९(४),३(५)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत भर दिवसा व रहदारीच्या रस्त्यावर झालेल्या या चोरीच्या घटनेने मात्र शहरात सर्वात भीतीचे वातावरण पसरले आहे.२०
“शहरातील चहा विक्री करणाऱ्या प्रवीण शहा यांच्या चावडी चौक येथील निवासस्थानी काल रात्री ३ ते ४ अज्ञात चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून घरातील सोने व मोबाईल चोरून तेथून पोबारा केला होता. शहरात एका मागे एक होणाऱ्या चोऱ्यांमुळे व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी सतर्क नागरिकांना राहण्याचे व संशयीत हलचाली निदर्शनास आल्यास कडेगांव पोलिस ठाण्यास संपर्क साधण्याचे आवाहन कडेगांव पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संग्राम शेवाळे यांनी केले आहे.