Search
Close this search box.

राज्यात धनगड ही जात नसून धनगर हीच जात आहे धनगडाचे एसटीचे प्रमाणपत्र रद्द करा….. प्रकाश भैय्या सोनसळे

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

रिपोर्टर: अभिषेक व्यास

पुणे। धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणी साठी राज्यभर लढा पेटलेला असून धनगर समाजाचे ठिकठिकाणी आमरण उपोषण होत आहेत रस्ता रोको होत आहे. धनगर समाजाच्या वतीने धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी वेगवेगळ्या पद्धतीने समाज बांधव हा रस्त्यावर उतरलेला आहे.
धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणी साठी पंढरपूर ,लातूर ,नेवासा, या ठिकाणी आमरण उपोषण करण्यात आले. तर काही ठिकाणी आमरण उपोषण चालू आहेत.महाराष्ट्र राज्यामध्ये धनगर समाज हा मोठ्या प्रमाणात आहे.
धनगर समाजाला एसटीचे आरक्षण अंमलबजावणी करिता राज्यामध्ये धनगड ही जात एसटीमध्ये आहे. राज्यामध्ये धनगड ही जातच नाही त्यामुळे धनगर ही जात आहे राज्य सरकारच्या लक्षात आणून देण्यासाठी अनेक ज्येष्ठ मंडळींनी यासाठी प्रयत्न केले. काही तुरटी सरकारच्या लक्षात आल्याच्या नंतर सरकारने यासाठी पाठपुरावाही केला परंतु अद्याप सरकारने धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आणखी मार्गी लावला नाही. यासाठी जे राज्यामध्ये धनगड समाजाचे खिलारे कुटुंब आहे हेच मुळात धनगर आहेत अगोदर खिलारे कुटुंबांचे एसटीचे प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे यासाठी धनगर समाजाचे काही समाज बांधव हे जात पडताळणी कार्यालय (औरंगाबाद )संभाजीनगर येथे उपोषणास बसले आहेत सरकारने त्वरित धनगडांचे एसटीचे प्रमाणपत्र रद्द करावे व धनगर समाजाच्या आरक्षणासाठी सरकारने एक पाऊल पुढे टाकून गोरगरीब कष्टकरी मेंढपाळ रानावनात राहणारा धनगर समाज भटकंती करणारा धनगर समाज ऊन वारा पावसात राहणारा हा धनगर समाज या समाजासाठी सरकारने पुढाकार घ्यावा.
या मागणीसाठी आज आष्टी तहसील कार्यालययेथे मा.मोरे साहेब नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यावेळी धनगर समाजाचे नेते, समाजसेवक, धनगर समाज संघटना अध्यक्ष प्रकाश भैय्या सोनसळे, बनसोडे उपसरपंच, मोहन मैदड, नंदू गिरे, अशोक आरगडे, बाळासाहेब बनसोडे, राहुल गावडे, आजिनाथ गावडे, सौरव वैद्य, तागड मामा साईनाथ ढोरमारे, गोपाल सरोदे, गोकुळ गवळी, अविनाश मैंदड , गोविंद आरगडे कृष्णा आरगडे, सनी गडदे, गणपत महारनवर,आदींच्या उपस्थितीमध्ये निवेदन देण्यात आले.

Leave a Comment

और पढ़ें