Search
Close this search box.

वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात लोकमान्य टिळक जयंती साजरी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी – अतुल काळे

सांगली/तासगाव : “स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच.” या घोषणेचे उद्गाते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालय तासगाव येथे साजरी करण्यात आली.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे यांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजनाचा सोहळा संपन्न झाला.यावेळी बोलताना प्राचार्य म्हणाले टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे पहिले नेते होते.ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना “भारतीय असंतोषाचे जनक” म्हटले. त्यांना “लोकमान्य” ही पदवी देखील बहाल करण्यात आली, लोकांनी त्यांचा नेता म्हणून स्वीकार केला होता.टिळक हे स्वराज्याचे पहिले आणि प्रबळ पुरस्कर्ते होते. तसेच ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक मजबूत जहालवादी नेते होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम कमिटी प्रमुख डॉ.साईनाथ घोगरे यांनी केले तर आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. आण्णासाहेब बागल यांनी मानले. कार्यक्रमाला उपप्राचार्य जे.ए.यादव,क्रीडा विभाग प्रमुख प्रा. ए.के.पाटील ,डॉ.विशाल पाटील,प्रा.नितीन वाघमारे,प्रा.शेरकर ,प्रा. गुंजाळ प्रा.आर.के.नलवडे, डॉ.अनिता मगदूम , पुजा बुवा, नलिनी कदम यांसह महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें