Search
Close this search box.

नवीन फौजदारी कायदे १ जुलै पासून लागू होणार -सी.आर.पाटील.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कडेगांव प्रतिनिधी हेमन्त व्यास

नवीन फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी दिनांक १ जुलै २०२४ पासून होणार असल्याची माहिती कडेगांव न्यायालयाचे सह दिवाणी न्यायाधीश श्री. सी आर पाटील यांनी व्यक्त केले.
कडेगांव तालुका वकिल संघटना व कडेगांव तालुका विधी सेवा समिती यांचे वतीने तहसील कार्यालय कडेगांव येथे कायदेविषयक शिबिर आयोजित केले होते सदर कार्यक्रमात ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की,आपल्या देशात अस्तित्वात असणारे इंडियन पिनल कोड,भारतीय पुरावा कायदा, क्रिमिनल प्रक्रिया सहिंता हे फौजदारी कायदे बदलून त्या ऐवजी भारतीय न्याय सहींता 2023,भारतीय साक्ष अधिनियम 2023 व भारतीय नागरिक सुरक्षा कायदा 2023 हे नवीन कायदे अस्तित्वात आणलेले आहेत.नवीन कायद्यामध्ये काही कलमे कमी केली असून एकसारख्या गुन्ह्यांची कलमे एकत्रित केलेली आहेत.तसेच महिला विषयक गुन्ह्यांची कलमे विखुरलेले होते ते एकत्र केलेली आहेत.तसेच शिक्षेच्या तरतुदींमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बदल केले आहेत.
यावेळी कडेगांव चे तहसीलदार अजित शेलार म्हणाले की, नवीन फौजदारी कायदे लोकांनी लवकर समजून घेतले पाहिजेत.त्यासाठी सर्वांनी माहिती घेतली पाहिजे.नवीन फौजदारी कायदे अश्या प्रकारच्या शिबिर मुळे लवकर लोकांना माहिती होतील.त्यामुळे सदरचे शिबिर तहसील कार्यालय येथे ठेवलेले आहे.
यावेळी कडेगांव तालुका वकिल संघटना अध्यक्ष ॲड.प्रमोद पाटील म्हणाले की, नवीन फौजदारी कायदे लोकांना माहिती होणे साठी सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय यांचे निर्देशानुसार अशी शिबिरे आयोजित केली जातात.आम्ही लवकरच संपूर्ण कडेगांव तालुक्यात गावोगावी कायदेविषयक शिबिर आयोजित करणार आहे.लोकांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा.मला कायदा माहीत नव्हता असे कोणालाही महणता येत नाही.
यावेळी ॲड. एस . पी.पाटील, ॲड.जयवंतराव देशमुख, ॲड.चैतन्य यादव, ॲड.अभिजित मोरे, ॲड.संग्राम मंडले ॲड.जनार्दन महस्के, ॲड.सुभाष माने व तालुक्यातील विविध गावचे लोक तसेच तहसील कार्यालयातील व विविध शासकीय कार्यालयातील कर्मचारी हजर होते. आभार श्री. सोनवणे यांनी मानले.

Leave a Comment

और पढ़ें

जेवर एयरपोर्ट के द्धितीय चरण में अधिग्रहण की जा रही भूमि से प्रभावित कृषकों की समस्याओं का त्वरित गति से निस्तारण कराने के उद्देश्य से आज छेदी सिंह इंटर काॅलिज आकलपुर, म्याना जेवर में किसान चौपाल का किया गया आयोजन

जेवर एयरपोर्ट के द्धितीय चरण में अधिग्रहण की जा रही भूमि से प्रभावित कृषकों की समस्याओं का त्वरित गति से निस्तारण कराने के उद्देश्य से आज छेदी सिंह इंटर काॅलिज आकलपुर, म्याना जेवर में किसान चौपाल का किया गया आयोजन