प्रतिनिधी – अतुल काळे
सांगली /तासगाव : मुस्लिम समाज बांधवांचा पवित्र रमजान ईद सण सोमवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तासगाव चिंचणी रोडवरील इदगाह मैदान येथे सकाळी नमाज पठणसाठी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी खासदार संजयकाका पाटील यांनी ईदगाह मैदानावर उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या मात्र आमदार रोहित पाटील यांची अनुपस्थिती जाणवली असल्याची चर्चा मुस्लिम बांधवात सुरू होती.