शिक्षकांवर निष्ठा ठेवून अभ्यास करा यश निश्चितच मिळेल -डॉ.मिथिलेश पाटील

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी – अतुल काळे

सांगली/तासगाव : बारावीचे वर्ष आपल्या आयुष्याचे टर्निंग पॉईंट असते. अभ्यासाचे वेळापत्रक तयार करा.शिक्षकांवर निष्ठा ठेवून अभ्यास करा यश निश्चितच मिळेल असे प्रतिपादन डॉ.मिथिलेश पाटील यांनी केले. पद्मभूषण डॉ.वसंतरावदादा पाटील महाविद्यालय, तासगाव येथे बारावी विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे यांच्या हस्ते एमबीबीएस डिग्री प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केल्याबद्दल डॉ.मिथिलेश पांडुरंग पाटील यांचा सत्कार करण्यात आला.डॉ. मिथिलेश पाटील पुढे म्हणाले, शिक्षकांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करा काही अडचणी असतील तर शिक्षकांशी संवाद साधा.तुमच्या आवडीचे क्षेत्र निवडा ज्या विषयात तुम्हाला रुची वाटते तो विषय निवडा.जीवशास्त्र, रसायनशास्त्र,भौतिकशास्त्र,गणित या विषयावर प्रभुत्व मिळवा.सरावाने सर्व काही शक्य होते यावर विश्वास ठेवा.महाविद्यालयात सुरू असलेल्या एमएचटी-सीईटी वर्गाचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थांना करून प्रोत्साहित केले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना विज्ञान विभाग प्रमुख प्रा.पी.डी.पाटील यांनी बारावीनंतरच्या करिअर संधी या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.आपल्याकडे चांगली गुणवत्ता असेल तर शिक्षणासाठी जास्त पैसे लागत नाहीत हे त्यांनी विविध उदाहरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पटवून दिले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.अरुणा सुतार यांनी केले तर आभार जीवशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डी.व्ही.पाटील यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. आण्णासाहेब बागल यांनी केले.कार्यक्रमाला सीईटी प्रमुख प्रा.आर.डी.पाटील, प्रा.आर.एस.पाटील,प्रा.के. एस.गायकवाड,प्रा.एस.एन.पाटील,प्रा.पी.ए. पाटील,प्रा.रणजीत पाटील, प्रा.प्रणया पाटील,प्रा.पुनम सुतार, प्रा.रिजवाना मुल्ला, प्रा.जी.एस.पाटील,प्रा. सरिता पाटील यांसह प्राध्यापक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें