प्रतिनिधी – अतुल काळे
- पीडीव्हीपी महाविद्यालयाची विद्यार्थिनी सानिया पाटील ‘वसंत कन्या’ पुरस्काराने सन्मानित
सांगली/तासगाव : महिलांचा सन्मान करूया त्यांना प्रोत्साहन देवून महिलांच्या यशाचे उत्सव साजरे करूया असे उद्गार न्यायाधीश बी.आर.अवचारे दुर्गवडे यांनी पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालय तासगाव येथे महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना काढले.त्या पुढे म्हणाल्या स्त्रीच्या जगण्याच्या प्रत्येक टप्प्यावर तिला कायद्याने संरक्षण दिले असून कायद्याने स्त्री पुरुष समान आहेत.पूर्वीच्या काळी सतीप्रथा , देवदासी प्रथा यांसारख्या अनेक अनिष्ट प्रकार होत्या.आपल्या समाजसुधारकांनी त्या मोडीत काढून स्त्रियांना सन्मानाची वागणूक देण्याचा प्रयत्न केला.विधवा पुनर्विवाह सुरू केला.सती प्रथा देवदासी प्रथा बंद केल्या.स्त्रियांवर अत्याचार झाल्यास कायद्यात कडक तरतूद करण्यात आली आहे. कौटुंबिक हिंसाचार,भावनिक हिंसाचार, मानसिक हिंसाचार,आर्थिक हिंसाचार असे हिंसाचाराचे प्रकार सांगून महिलांचा आदर करण्याचे आवाहन केले.यावेळी महाविद्यालयातील कु.सानिया प्रवीण पाटील या विद्यार्थिनीला ‘वसंत कन्या’या पुरस्काराने सन्मानित केले.दिल्ली येथील आरडी परेड साठी जाणारी ही महाविद्यालयाची पहिली विद्यार्थिनी आहे. यावेळी महाविद्यालयातील महिला भगिनींचा भेटवस्तू देवून सन्मान केला.तसेच महाविद्यालयाची स्वच्छता करणाऱ्या कविता अमित कांबळे, आयशा फिरोज सय्यद या महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान प्राचार्यांच्या हस्ते करण्यात आला.
अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे म्हणाले समाजाच्या जडणघडणीत महिलांचे योगदान खूप मोठे आहे. स्त्रियांकडे पुरुषांपेक्षा जास्त क्षमता आहेत. स्त्रिया अबला नव्हत्या त्यांना गरज होती फक्त आत्मविश्वासाची हे सांगून श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिव पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळणाऱ्या सौ. शुभांगीताई गावडे मॅडम आणि शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांना ज्ञान प्रसाराच्या कार्यात सहाय्य करणाऱ्या संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.मेघा पवार यांनी केले तर आभार डॉ.एस.एस.परचुरे यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.पुनम पाटील यांनी केले कार्यक्रमाला उपप्राचार्य जे.ए.यादव,प्रा.पल्लवी मिरजकर,प्रा.प्रगती जाधव,प्रा.स्वाती घाटगे, प्रा वैशाली पाटील, प्रा. आण्णासाहेब बागल , प्रा. रमेश मोटे, डॉ.टी.के.बदामे, डॉ. दत्तात्रय थोरबोले, कॅप्टन विनोदकुमार कुंभार, डॉ.अमोल सोनवले, प्रा प्रकाश खाडे यांसह सर्व विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक ,विद्यार्थी – विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.