तासगावात ‘युनायटेड’ कडून विमा जागृती अभियान

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी – अतुल काळे

सांगली /तासगाव : भारत सरकारच्या ‘इन्शुरन्स फॉर ऑल बाय 2047’ संकल्पनेला जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीने पुढाकार घेत तासगाव शहरात विविध ठिकाणी विमा माहिती पुस्तिकेचे वाटप केले असून सदर उपक्रमास नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या उपक्रमासाठी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीचे अधिकारी, कर्मचारी, विमा सल्लागार कैलास शिंत्रे, महादेव पाटील उपस्थित होते. यावेळी विम्या (इन्शुरन्स) संदर्भात नागरिकांना माहिती देण्यात आली. एखादी आपत्ती अचानकपणे आल्यास विमा कसा उपयोगी पडतो, त्याचे फायदे कसे होतात हे यावेळी स्पष्ट करण्यात आले. त्याचबरोबर विमा संदर्भातील माहिती पुस्तिका नागरिकांना मोफत वाटण्यात आली. विम्या बाबत नागरिकांनी जागरूक राहून वेळीच विमा घेणे महत्त्वाचे असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Leave a Comment

और पढ़ें