रोटरी क्लबच्या वतीने पोलीस सहायता केंद्राचे उद्घाटन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी – अतुल काळे

  • प्रवासांच्या हितासाठी रोटरीचे पाऊल पुढे
  • प्रवाशांची बहूप्रतिक्षित मागणी पूर्णत्वास

सांगली/ तासगाव : तासगाव बस स्थानकात होणाऱ्या छोट्या मोठ्या चोऱ्या, पाकीट मारी, विद्यार्थ्यांमध्ये होणारी भांडणे यावर आळा बसण्याच्या दृष्टिकोनातून रोटरी क्लब ऑफ तासगावच्या वतीने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि सार्वजनिक सुरक्षितता वाढवण्यासाठी तासगाव एस.टी. स्टँड येथे पोलीस सहायता केंद्र सुरू करण्यात आले असून या केंद्राचे उद्घाटन रोटरीचे माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नासिर बोरसादवाला आणि पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या हस्ते करण्यात आले.

या उपक्रमासाठी रोटरी क्लब तासगांव चे अध्यक्ष राजेंद्र विटेकर आणि सचिव किशोर पाटील यांनी विशेष प्रयत्न केले. तसेच निसर्ग अ‍ॅग्रोचे चंद्रकांत खरमाटे यांनी आर्थिक सहाय्य करत प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी महत्त्वाची भूमिका बजावली.

या सहाय्यता केंद्रामुळे बस स्थानकावरील चोरी, छेडछाड आणि अन्य गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण मिळविण्यास मदत होईल. महिलांना, प्रवाशांना आणि नागरिकांना तातडीची मदत मिळण्यास मदत होणार आहे. तासगावच्या नागरिकांची ही दीर्घकालीन मागणी पूर्ण झाली आहे.

यावेळी रोटरी क्लब सदस्य, रोट्रॅक्ट सदस्य, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यापूर्वी रोटरी क्लबने प्रवाशांसाठी सुरक्षित पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एस.टी. स्टँड येथे वॉटर Ro प्युरिफायर बसवला आहे तसेच कंट्रोल केबिनची सोय केली आहे. अशा सामाजिक उपक्रमांमुळे नागरिकातून रोटरी क्लबच्या कार्याचे कौतुक केले जात आहे.

Leave a Comment

और पढ़ें