प्रतिनिधी -अतुल काळे
- हिरव्या बेदाण्याचा दर 300 पार
सांगली/ तासगाव : कृषी उत्पन्न बाजार समिती तासगाव येथील धारेश्वर ट्रेडिंग कंपनी दुकानात झालेल्या बेदाणा सौद्यामध्ये शेतकरी नितीन शिंदे यांच्या हिरव्या बेदाण्यास 311 रुपये प्रति किलो असा उच्चांकी दर मिळाला असून कृषी उत्पन्न बाजार समिती तासगाव येथे होणाऱ्या सौद्यामध्ये बेदाण्यास दुसऱ्या आठवड्यात वाढता दर मिळत असल्याने शेतकऱ्यातून समाधान व्यक्त होत आहे.
सोमवारी झालेल्या बेदाणा सौद्यामध्ये हिरव्या वेतन्यास 155 ते 311, पिवळ्या बेदाण्यास 150 ते 195 आणि काळा बेदाण्यास 40 ते 105 रुपये प्रति किलो असा दर मिळाला. या सौद्यावेळी तेरा दुकानात नवीन मालाची आवक झाली. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेशभाऊ पाटील, सभापती युवराजदादा उर्फ सुनील पाटील, संचालक सुदाम माळी, कुमार शेटे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
सदर सौद्यास खरेदीदार व्यापारी मनोज मालू, राजु कुंभार, केतन सुचक, पणू सारडा, भावेश मजेठिय्या, एस.जी. मर्दा, शरदचंद्र मनोहरभाई पटेल, एस मणिलाल, रितेश मजेठिय्या, किरण बोडके, रवि बाफना, लक्ष्मण पाटील, बबलू पाटील, सतिश माळी, पंजाबराव माने-पाटील, विठ्ठल पाटील, विकास शहा, हेंमत हिंगमिरे, विठ्ठल पाटील सुभाष हिंगमिरे, रामचंद्र माळी, जगन्नाथ घणेरे, संजय बोथरा, सुनिल पैलवान, राजू शेटे, प्रकाश लुनिया, मोहन निकम, व इतर सर्व खरेदीदार व्यापारी महाराष्ट्र व कर्नाटकातील बेदाणा उत्पादक शेतकरी उपस्थित होते.