Search
Close this search box.

कोण घेणार अर्ज मागे? याकडे लक्ष

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी – अतुल काळे

सांगली/तासगाव : तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा निवडणुकीसाठी तब्बल 33 उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून दिनांक 4 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. दि. 4 अखेर कोणते उमेदवार अर्ज मागे घेणार याकडे आता लक्ष लागून राहिले आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने रोहित आर. आर. पाटील हे निवडणूक लढवत आहेत. उर्वरित उमेदवारांमध्ये रोहित आर. पाटील नावाचे इतर 3 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. तासगाव तालुक्यातील चिंचणी, निमणी आणि नेहरूनगर येथून प्रत्येकी एक अशा एकूण तीन इतर उमेदवारांमुळे रोहित पाटील यांना डोकेदुखी ठरणार आहे. नावातील साम्यामुळे मते विभागली अशी नागरिकात चर्चा आहे. अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी अपक्ष रोहित पाटील अर्ज मागे घेणार का? याकडे लक्ष लागून राहिले आहे. 33 उमेदवारांपैकी प्रत्यक्षात किती जण निवडणूक लढवणार याकडेही उत्सुकतेने पाहिले जात आहे.

Leave a Comment

और पढ़ें