प्रतिनिधी – अतुल काळे
सांगली/तासगाव : विधानसभा निवडणूक 2024 साठी तासगाव पोलीस सतर्क झाले असून आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी विशेष काळजी घेताना दिसून येत आहेत.
शनिवार दि. 2 रोजी सिद्धेश्वर रोडवरील वंदे मातरम चौक येथील प्रसिद्ध मेडिकल दुकान रात्री ११:३० च्या सुमारास सुरू होते. पोलीस गाडीतून रात्रगस्त घालणाऱ्या अधिकाऱ्यानी मेडिकल सुरू असल्याबाबत कान उघडली केली. रात्रीच्या वेळी केवळ औषधे विक्री सुरू असणे अपेक्षित असताना इतर वस्तू विक्री सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी कठोर कारवाईचे संकेत दिले. त्याचबरोबर सिद्धेश्वर चौक येथे दुचाकी वर ठिया मांडून मोठ्या आवाजात चर्चा करत बसलेल्या नागरिकांनाही पोलिसांनी हूसकवून लावले. त्यामुळे निवडणूक काळात पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा पवित्रा तासगाव पोलिसांकडून घेण्यात आला आहे.