प्रतिनिधी – अतुल काळे
सांगली/तासगाव : विधानसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर तासगाव शहरासह तालुक्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी तासगाव पोलिसांकडून ‘रूट मार्च’ काढण्यात आला. मंगळवार दिनांक 29 रोजी महायुती चे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जाहीर सभा होणार आहे. या अनुषंगाने पूर्वसध्येला पोलिसांकडून सतर्कता दाखवत तासगाव शहरातून पथसंचलन करण्यात आले. यावेळी तासगाव ठाण्याकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, जलद कृती दलाचे जवान असा मोठा पोलीस फौज फाटा पथसंंचालनामध्ये सामील होता. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांची गय केली जाणार नाही असे आवाहन पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी केले आहे.