Search
Close this search box.

जय हनुमान विकास सोसायटी संचालक मंडळावर करणे दाखवा नोटीस : अंतिम सुनावणी २१ ऑक्टोबरला

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी – अतुल काळे

  • सहाय्यक निबंधक काय देणार निकाल याकडे लक्ष

सांगली /तासगाव : निमणी (ता. तासगाव) येथील जय हनुमान विकास सोसायटीच्या संचालक मंडळाने कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचा उलघडा झाल्याने बँकेने कर्ज वाटप थांबवले असून या प्रकाराबाबतची अंतिम सुनावणी 21 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
याबाबत माहिती अशी, गोडाऊन बांधकाम, दूध संकलन व पशुखाद्य साठवणूक उद्देशाकरिता हनुमान विकास सोसायटीने सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून नाबार्डच्या PACS योजनेअंतर्गत ४० लाख रुपये कर्ज मंजूर करून घेतले.
संस्थेच्या मालकीच्या जागेचे दुय्यम निबंधक तासगाव यांच्यासमोर रजिस्टर तारण गहाणखत केले. त्या आधारे संस्थेच्या मालकीच्या ७/१२ उताऱ्यावर बोजा चढविण्यात आला.
संस्थेने सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था तासगाव यांच्याकडे बँकेच्या मंजुरी पत्रासह बांधकाम मंजुरीसाठी प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावासोबत जोडलेल्या कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचे, मूळ खरेदी दस्त, तारण खतातील जागेच्या चतु:सीमा आणि चतु:सीमा चुकलेने नव्याने केलेला चूक दुरुस्ती लेख, वार्षिक सर्वसाधारण सभेतील ठरावानुसार केलेले वहिवाट पत्र यामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या चतु:सीमा दर्शविण्यात आल्या. त्यामध्ये मोठी तफावत अजून आली. सरपंच ग्रामपंचायत नेहरूनगर यांचा खोटा दाखला जोडलेचे, तसेच उपविभागीय अधिकारी मिरज यांचा जमीन विक्री परवानगी आदेश, तहसीलदार तासगाव यांचा आवश्यकता परवानगी घेतल्याशिवाय बांधकाम न करणे बाबतचा आदेश, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सांगली यांनी बांधकामास दिलेला स्थगिती आदेश, नियमाप्रमाणे सर्व संबंधित विभागाच्या आवश्यक परवानगी घेऊन बांधकाम करण्यास हरकत नाही असे लेखी कळवूनही जबरदस्तीने सुरू केलेले बांधकाम हे सर्व निबंधकाच्या निदर्शनास न आणता प्रस्ताव सादर केला होता असा युक्तिवाद तक्रारदार निमणी विकास सोसायटीचे माजी चेअरमन श्री बाळासाहेब पाटील यांनी सहाय्यक निबंधक यांच्यासमोर केला आहे. तक्रार केल्यानंतर या सर्व गोष्टींचा उलगडा झाला. बँकेला लेखी तक्रार दिल्यानंतर बँकेने कर्ज वाटप थांबवले होते.
सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तासगाव यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १४६ अन्वये संचालक मंडळावर कारवाई का करू नये? अशा आशयाची नोटीस संचालक मंडळाला बजावली आहे.
यासंदर्भात सहाय्यक निबंधक यांच्यासमोर सुनावणी सुरू असून अंतिम सुनावणी सोमवार २१ ऑक्टोबर २०२४ रोजी होणार आहे. यासंदर्भात सहाय्यक निबंधक काय निकाल देणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Comment

और पढ़ें