Search
Close this search box.

कार्यालयातील कामकाजामध्ये पारदर्शकता असावी यासाठी माहिती अधिकार कायदा : मिलिंद सुतार

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी – अतुल काळे

  • तासगाव नगर परिषदेत माहिती अधिकार कार्यशाळा संपन्न

सांगली/तासगाव : कोणत्याही कार्यालयातील कामकाजामध्ये पारदर्शकता असावी या उद्देशाने माहिती अधिकार कायदा तयार करण्यात आला. दुर्दैवाने काही जण या कायद्याचा गैरवापर करतात. त्यामुळे या कायद्याकडे सामान्य माणूस स्वच्छ नजरेने बघत नाही. या कायद्याचा समाजाच्या हितासाठी सुद्धा वापर केला जावू शकतो. या कायद्याची अंमलबजावणी करताना कर्मचाऱ्यांनी अर्जदाराशी सौजन्याने वागणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन मिलिंद सुतार यांनी केले. तासगाव नगर परिषदेत माहिती अधिकार कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते.
तासगाव नगर परिषदेने भव्य चार मजली नवीन इमारतीचे बांधकाम केले असून या इमारतीचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. त्यानंतर सोमवार पासून नव्या इमारतीमध्ये कार्यालयीन काम काजास सुरुवात करण्यात आली. या नूतन इमारतीमधील माजी राष्ट्रपती स्व.डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या दि.१५ ऑक्टोंवर जन्म दिवस वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून सर्व सोयींनीयुक्त अशा सभागृहात माहिती अधिकार कार्यशाळा या कार्यशाळेत सर्व उपस्थित अधिकारी कर्मचारी यांचे अधिनियमाचे वाचन केले. या कार्यशाळेचे आयोजन प्रशासक तथा मुख्याधिकारी मा. पृथ्वीराज पाटील यांनी केले होते. नवीन सभागृहातील हा पहिलाच कार्यक्रम संपन्न झाला.

Leave a Comment

और पढ़ें