Search
Close this search box.

आयुष हेल्पलाइन टीम च्या मदतीने विहिरीतील मृतदेह बाहेर

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी : अतुल काळे (तासगाव)

सांगली : सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात असणाऱ्या चिंचणी मंगरूळ येथील 40 फूट खोल विहिरीमध्ये अडकलेला मृतदेह केवळ 20 मिनिटात शोधून काढण्यात आला असून केलेल्या सहकार्याबद्दल आयुष हेल्पलाइन टीमचे आभार मानण्यात आले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, चिंचणी मंगरूळ येथे शेतातील विहिरीमध्ये दि. 14 रोजी अनिता कदम या बुडाल्या असल्याची असल्याची घटना घडली. त्यांचा मृतदेह शोधून विहिरीतून बाहेर काढणे अवघड बाब होती. याबाबत सामाजिक कार्यकर्ते विवेक भिंगारदिवे यांनी कवलापूरच्या आयुष हेल्पलाइन संस्थेची संपर्क साधला. टीमला मदतीची हाक दिली. माहिती मिळताच दि. १५ रोजी आयुष हेल्पलाइन टीमने घटनास्थळी धाव घेतली. टीम प्रमुख अविनाश पवार, नरेश पाटील, रुद्र प्रताप कारंडे, चिंतामणी पवार, यश मोहिते, कार्तिक होसमनी आदींच्या प्रयत्नामुळे केवळ 20 मिनिटात 40 फूट खोल विहिरीमधील मृतदेह हाती लागला. यावेळी स्थानिक नागरिक, पोलीस उपस्थित होते. आयुष हेल्पलाइन टीमने केलेल्या सहकार्याबद्दल पोलीस व कदम कुटुंबीयांकडून त्यांचे आभार मानण्यात आले. सदर घटनेचा तपास विटा पोलीस करीत आहेत.

Leave a Comment

और पढ़ें