प्रतिनिधी – अतुल काळे
सांगली/तासगाव : शिक्षण हे पारंपरिक अध्ययन शिकण्याच्या प्रक्रियेतून सक्षमतेवर आधारित शिक्षणाकडे जात आहे त्याचबरोबर शिक्षणामध्ये गुणवत्ता हमी हा महत्त्वाचा घटक आहे. उच्च शिक्षणातील विविध विद्याशाखा त्यांचे अभ्यासक्रम आणि संबंधित विषय यांमधील परस्पर सहसंबंध व त्यामुळे होणारी प्राप्ती अर्थात (PO’s, PSO’s & CO’s) याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. सदर मूल्यमापन पद्धत राबवून विद्यार्थ्यांची अध्ययन प्रणाली पडताळणे गरजेचे आहे,असे मार्गदर्शन प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे यांनी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व वर्ग समन्वयक आयोजित एक दिवसीय कार्यशाळेमध्ये केले.
कार्यक्रमाप्रसंगी बोलताना तज्ज्ञ मार्गदर्शक सहाय्यक प्रा.सुधीर कुंभार, दहिवडी कॉलेज दहिवडी यांनी आउटकम बेस्ड लर्निंग फिलोसॉफी, ब्लूम्स टॅक्सानॉमी पॅरामीटर्स, आऊट कम बेस्ड कोर्स असेसमेंट,एलटी-टीएल ट्रान्सफॉर्मेशन यावरती सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. ए.जी. सोनवले तर प्रमुख पाहुण्यांची ओळख डॉ. आर. ए. काळेल यांनी केली. प्रा. पी. आर. खाडे यांनी कार्यक्रमाचे आभार मानले. सदर कार्यक्रमास अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयीका डॉ. मेघा पाटील, प्रा.जे. ए.यादव, प्रो. एन.ए. कुलकर्णी तसेच महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते उपस्थित होते.