प्रतिनिधी – अतुल काळे
सांगली/तासगाव : नेहरूनगर (ता.तासगाव) येथील नंदीवाले समाजाच्या १५० ग्रामस्थांना व विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य नंदीवाले समाज संघटनेतर्फे जातीच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले।
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजयदादा पाटील, निमणीचे माजी उपसरपंच आर. डी. पाटील, तुरचीचे सरपंच व सरपंच परिषदेचे तालुका अध्यक्ष विकास डावरे, माजी सरपंच सदाशिव खरात, माजी उपसरपंच पंडित पाटील, बालाजी पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र भोसले, पलूस तालुका शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रदीप मोकाशी, राज्य कमिटी उपाध्यक्ष अण्णा पवार, सांगली जिल्हा अध्यक्ष भाऊसाहेब भास्कर देशमुख, बांधकाम कामगार संघटनेचे उपाध्यक्ष महादेव जाधव, रामलिंग मोकाशी उपस्थित होते।
समाज मंदिरासमोर झालेल्या कार्यक्रमात सर्जेराव देशमुख बोलताना म्हणाले, दाखले काढताना आलेल्या अडचणींवर मात करून दाखले मिळवले आहेत. समाजाच्या जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले।
यावेळी बोलताना, आर. डी. पाटील म्हणाले, कधीकाळी उपेक्षित असलेल्या नंदीवाले समाजातील तरुणांनी शैक्षणिक, सामाजिक राजकीय , सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी जातीचे दाखले असणे आवश्यक आहे. सर्वांनी आपापले दाखले काढून घ्यावेत।
माजी जि. प. सदस्य संजयदादा पाटील म्हणाले, नंदीवाले समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच सहकार्य राहील।
या दाखले वाटप कार्यक्रमास नंदीवाले समाज बांधव, ग्रामस्थ, विद्यार्थी -विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते।