Search
Close this search box.

विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी नवोपक्रम राबवावेत – प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी – अतुल काळे

  • वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात शिक्षण सप्ताह उत्साहात साजरा

सांगली/तासगाव : सर्वगुणसंपन्न विद्यार्थी घडविण्यासाठी अध्यापना बरोबरच विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी महाविद्यालयात नवोपक्रम राबवावेत असे उद्गार प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे यांनी पद्मभूषण डॉ.वसंतरावदादा पाटील महाविद्यालय तासगाव येथे शिक्षण सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना काढले.राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या आदेशान दिनांक २२ जुलै ते २८ जुलै या कालावधीत पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालय,तासगाव येथे शिक्षण सप्ताह साजरा करण्यात आला. पहिल्या अध्ययन अध्यापन दिवसाचे औचित्य साधून पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन केले.मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवसाच्या अनुषंगाने प्रा.प्रभाकर पाटील यांचे व्याख्यान विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध केले.क्रीडा दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या स्पर्धा घेऊन खेळाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले.सांस्कृतिक दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी लोककला , लोकनृत्य, सुगम गायन, करा ओके गीत गायन, पाककला,वास्तुकला प्रदर्शनाचे आयोजन केले.कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवसांतर्गत बांबूपासून विविध वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण सौ. संध्या सुर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना दिले.इको क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वृक्षारोपण ‘एक पेड मा के नाम’ हा उपक्रम घेतला यावेळी डॉ.अर्जुन वाघ यांनी पर्यावरणाचे महत्त्व विशद केले.सप्ताहाच्या सातव्या दिवशी समूह सहभाग दिवसानिमित्त माजी इतिहास विभाग प्रमुख प्रा.जी.के.पाटील यांचे व्याख्यान आयोजित केले.विद्यांजली कार्यक्रमाची जनजागृती समाजात व्हावी यासाठी रॅली काढली.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. एफ.बी.वलांडकर यांनी नोडल अधिकारी म्हणून काम पाहिले. ज्युनिअर विभाग प्रमुख एस.डी.पाटील,विज्ञान विभाग प्रमुख प्रा.पी.डी. पाटील यांच्या सहकार्याने हा सप्ताह उत्साहात संपन्न झाला.यामध्ये सर्व गुरुदेव कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.एस.आर.पाटील यांनी केले तर आभार प्रा.आर.डी. पाटील यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. आण्णासाहेब बागल यांनी केले.कार्यक्रमाला प्रा.एस.पी. कोळपकर,प्रा.आर.के. नलवडे, प्रा.के.एस. गायकवाड,प्रा.आर.जे. काळभोर,प्रा.एस.एन. पाटील, प्रा.ए.एस. निंबाळकर, प्रा.डी.एन.यादव- पाटील, प्रा.डी.एच.पाटील, प्रा.ए.एस.सुतार,प्रा.एस.व्ही. माळी यांसह महाविद्यालयातील प्राध्यापक,प्रशासकीय सेवक वर्ग, विद्यार्थी -विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें