Search
Close this search box.

चंपाबेन शाळेत गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यार्थी गुणगौरव समारंभ उत्साहात

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी – अतुल काळे

सांगली/तासगाव : तासगाव येथील सांगली शिक्षण संस्थेच्या चंपाबेन वाडीलाल ज्ञानमंदिर प्रशालेत गुरुपौर्णिमेनिमित्त विविध स्पर्धापरीक्षांमध्ये उज्ज्वल यश प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न झाला. यावेळी सांगली शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष रवींद्र देवधर, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शाळेचे माजी शिक्षक उत्तम औताडे, शाळेचे मुख्याध्यापक मुकुंद जोग, पर्यवेक्षक प्र.ना.ऐतवडेकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ अर्चना माळी उपस्थित होते.

इ.१०वी माध्यमिक शालांत परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच एमटीएस परीक्षा, इ.५वी व८वी शिष्यवृत्ती परीक्षा, इ.७वी शताब्दी शिष्यवृत्ती व इ.६वीगुणवत्ता शोध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांच्या वतीने कु. प्रांजल गायकवाड,अमेय टेके यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री औताडे सर यांनी आपल्या गोष्टीरुप मनोगतातून विद्यार्थ्यांना जीवनात विनम्रता अंगिकारण्याचा उपदेश केला तर कार्यक्रमाध्यक्ष रवींद्र देवधर यांनी विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रस्ताविक ज्येष्ठ शिक्षक चंद्रकांत बेडगे यांनी तर सूत्रसंचालन नितीन जोशी यांनी केले. श्री ऐतवडेकर सर यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें

जेवर एयरपोर्ट के द्धितीय चरण में अधिग्रहण की जा रही भूमि से प्रभावित कृषकों की समस्याओं का त्वरित गति से निस्तारण कराने के उद्देश्य से आज छेदी सिंह इंटर काॅलिज आकलपुर, म्याना जेवर में किसान चौपाल का किया गया आयोजन

जेवर एयरपोर्ट के द्धितीय चरण में अधिग्रहण की जा रही भूमि से प्रभावित कृषकों की समस्याओं का त्वरित गति से निस्तारण कराने के उद्देश्य से आज छेदी सिंह इंटर काॅलिज आकलपुर, म्याना जेवर में किसान चौपाल का किया गया आयोजन