Search
Close this search box.

विद्यार्थी रमले शेतीच्या बांधावर…! शिडवणे- नं 1 शाळेतील मुलांनी गिरविले बांधवारच्या शाळेचे धडे

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सिंधुदुर्ग-विवेक परब-

‘बांधावरची शाळा’ हा जिल्हा परिषदेचा उपक्रम, जिल्हा परिषद शाळा शिडवणे नं.1 प्रतिवर्षी नियोजनबद्ध पद्धतीने राबवित असते. यावर्षी मुख्याध्यापक व उपक्रमशील शिक्षक प्रवीण कुबल यांच्या मार्गदर्शना खाली शिडवणे ग्रामपंचायत सदस्य शांताराम धुमाळ यांच्या शेतात शेती विषयक सर्व प्रात्यक्षिके मुलांकडून करुन घेण्यात आली.

शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेंद्र धुमाळ म्हणाले, ” शाळेतील मुलांसाठी बांधावरची शाळा हा जिल्हा परिषदेचा उपक्रम स्तुत्य असून त्यामुळे मुलांमध्ये श्रमप्रतिष्ठा वाढीस लागते.” शाळेतील सर्व मुलांनी अतिशय उत्साहाने तरवा काढला, चिखल केला, जोत धरले, नांगरट केली. काढलेल्या तरव्याची रांगेत लावणी केली.

शाळेतील उपशिक्षिका सीमा वरुणकर, हेमा वंजारी यांनी देखील प्रात्यक्षिकात सक्रिय सहभाग घेतला. मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी उपस्थित शेतकऱ्यांच्या मुलाखती घेतल्या. सर्व शेतकऱ्यांनी शाळेतील मुलांना अतिशय आनंदाने कामात सहभागी करुन घेतले.

ग्रामपंचायत सदस्य शांताराम धुमाळ यांच्या वतीने सर्व उपस्थितांना अल्पोपहार देण्यात आला. मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी सर्वांचे आभार मानले.

Leave a Comment

और पढ़ें