Search
Close this search box.

जागतिक योग दिना निमित्त वाळवेकर लॉन्स पुणे येथे योग शिबिराचे आयोजन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

रिपोर्ट :- ऋषिकेश ओझा

पुणे : २१ जुन रोजी जागतिक योग दिना निमित्त वाळवेकर लॉन्स पुणे येथे पतंजली योग समिती पश्चिम व मा .नगरसेवक महेश वाबळे भाजपा यांच्या संयोगाने योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ह्या योग शिबिरात परिसरातील अनेक नागरिकांनी सहभाग घेऊन योग प्रात्यक्षिके केली. श्री गजानन महाराज योगासन प्राणायाम वर्गाचे योग गुरु मारुती फडतरे व त्यांचे सहकारी ह्यांनी योग प्रात्यक्षिके सादर केली व सर्वांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला मा .नगरसेवक महेश वाबळे भाजपा
विकास कांबळे, कैलास मोरे, औदुंबर कांबळे ,गजानन महाराज सेवा प्रतिष्ठानचे ट्रस्टी प्रताप बाठे , नरेंद्र चौबल योग शिक्षिक, अनुराधा चव्हाण योगशिक्षिका,व सर्व साधक उपस्थित होते.
प्रतिदिन योगा केल्याने आपले आरोग्य कसे निरोगी ठेवता येते ह्या संदर्भात योग गुरु मारुती फडतरे ह्यांनी मार्गदर्शन केले, तर आपल्या जीवनात व्यायामाचे व योगाचे महत्व कसे आहे हे
मा .नगरसेवक महेश वाबळे ह्यांनी आपल्या संभाषणात सर्वांना सांगितले.
पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक श्री.अरूण जोशी ह्यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. गणेश देवराय ह्यांनी केले.

Leave a Comment

और पढ़ें