Search
Close this search box.

. कलावती पाटील यांनी पूर्ण केले 61 वे वटसावित्री व्रत तासगावात वटपोर्णिमा सण उत्साहात

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

तासगांव प्रतिनिधि अतुल काले 

तासगाव : येथील सौ. कलावती सदाशिव पाटील यांनी वयाच्या 81 व्या वर्षी जवळपास 61 वे वटसावित्री व्रत पूर्ण करत भारतीय संस्कृती जपली. सौ. पाटील यांनी या वयात वटवृक्षा जवळ जाऊन केलेली पूजा त्यांच्या ठणठणीत प्रकृतीची साक्ष देत आहे. तासगाव तालुका काँग्रेस अध्यक्ष महादेवनाना पाटील यांच्या त्या मातोश्री आहेत.
वटपोर्णिमा सणानिमित्त सुवासिनींनी वटवृक्षाची पूजा करत वटपौर्णिमा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. हिंदू धर्मात वटपौर्णिमा सण सुवासिनींसाठी पवित्र आणि मानाचा मानला जातो. या दिवशी पतीला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी देवाकडे पत्नी प्रार्थना करत असते. सकाळी सहा वाजल्यापासून घरोघरी स्त्रियांची लगबग सुरु होती. पारंपारिक वेशभूषा करत महिलांनी नजीकच्या वटवृक्षाला जाणे पसंत केले. यावेळी वटवृक्षाचे मनोभावे पूजन करून नैवेद्य दाखवला. पारंपरिक प्रथेप्रमाणे 7 फेरे घेत जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी इच्छा व्यक्त करत वृक्षाला पांढरा दोरा गुंडाळला. सुवासिनींनी एकमेकांची ओटी भरून आपापसात सुख, समृद्धी, भरभराटी आणि पतीला दीर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छा दिल्या.
तासगाव शहरातील शनी मंदिर, जुनी चावडी, दत्त माळ-दत्त मंदिर येथे असणाऱ्या वटवृक्ष ठिकाणी महिलांनी मोठी गर्दी केली होती. काही महिलांनी घरातच कुंडीत लावलेला वटवृक्ष किंवा वटवृक्षाची प्रतिमा यांचे पूजन करत व्रत पूर्ण केले. तासगाव शहरासह तालुक्यामध्ये ठीक ठिकाणी मोठ्या उत्साहात वटपौर्णिमा सण साजरा केला असून महिलांमध्ये चैतन्याचे वातावरण पाहावयास मिळाले.

Leave a Comment

और पढ़ें