Search
Close this search box.

बंद पडलेले सीसीटीव्ही, वाचनालय तात्काळ सुरू करा : हेल्पिंग हँड्स फाउंडेशन ची मागणी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी – अतुल काळे

सांगली : तासगाव शहरातील बंद स्थितीत असलेले सीसीटीव्ही कॅमेरे त्याचबरोबर शहर नगर वाचनालय पुन्हा सुरू करणे बाबत मुख्याधिकारी तथा प्रशासक यांना निवेदन देण्यात आले असून सामाजिक जीवनात महत्त्वाच्या असलेल्या या गोष्टींवर हेल्पिंग हँड्स फाउंडेशन कडून प्रकाश टाकण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, तासगाव शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे व नगर वाचनालय गेले काही महिन्यापासून बंद आहेत सदर गोष्टींसाठी जनतेच्या खिशातील रक्कम कर स्वरूपात पालिकेकडे जमा होत आहे. त्या पैशातून विकास कामे होतात. परंतु शहरात बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे व नगर वाचनालय यावर करण्यात आलेला खर्च हा वाया जाताना दिसत आहे. शहरातील वाढती वाहन संख्या आणि होणारी वाहतूक कोंडी यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याने लक्ष ठेवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक, महिला, महाविद्यालयीन युवक-युवती, विद्यार्थी तसेच स्पर्धा परीक्षा देणारे युवक यांना अभ्यास व सामान्य ज्ञान यासाठी नगर वाचनालय अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. सांगली नाका येथे वाचनालयाची इमारत तयार आहे, मात्र वाचनालय बंद आहे. बंद पडलेले वाचनालय पूर्ववत सुरू करावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी हेल्पिंग हँड फाउंडेशनचे निलेश दिक्षित, सुशील थोरबोले, विशाल शिंदे, सुशांत पाटील, पद्माक्ष जोशी, राजू मुल्ला, सुधीर रसाळ, प्रसाद पैलवान, अथर्व जोशी, प्रणव हिंगमिरे, श्रीकांत गायकवाड, शुभम भाट, पुष्कर कालगावकर, गणेश भंडारी, प्रकाश माळी, अनिरुद्ध सुतार, आदित्य माळी, आसिफ तांबोळी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें