Search
Close this search box.

बॅडमिंटन स्पर्धेत हेमंत, वैभव अव्वल तासगाव तालुक्यात प्रथमच स्पर्धेचे आयोजन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी – अतुल काळे

सांगली/तासगाव : तासगाव तालुका मर्यादित बॅडमिंटन स्पर्धकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये हेमंत जोगळेकर आणि वैभव महाजन यांनी अव्वल स्थान पटकावले असून तालुक्यात प्रथमच भरवण्यात आलेल्या बॅडमिंटन स्पर्धेमुळे खेळाडूंमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

तासगाव बॅडमिंटन ग्रुप, तासगाव यांच्यावतीने शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत कै. संमतीलाल बोथरा स्मृती चषक बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सिंगल खेळाडू व डबल खेळाडू अशा दोन प्रकारांमध्ये सामान्यांचे आयोजन करण्यात आले होते. सिंगल प्रकारामध्ये हेमंत जोगळेकर – प्रथम, सोहम गुरव – द्वितीय आणि विनय जोतराव- तृतीय तर डबल खेळाडू स्पर्धेमध्ये हेमंत जोगळेकर – वैभव महाजन (प्रथम), आशिष बोथरा- एपीआय भांडवलकर (द्वितीय), डॉ. दानेश पोतदार -सोहम गुरव (तृतीय) या जोड्या विजेत्या ठरल्या. सदरची स्पर्धा दि. 8 व 9 जून रोजी पार पडली असून विजेत्यांना रोख रक्कम व सन्मानाचिन्ह देण्यात आले. गणपतराव कोळी हॉल, दत्तमाळ, तासगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेमधे 30 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. तासगाव येथील व्यापारी सचिन बोथरा यांच्या सौजन्याने बक्षिस वाटप करण्यात आले तर सुधाकर कोळी, सतीश सोनवणे, राजेश रोमन सर यांच्यासह बॅडमिंटन ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी स्पर्धेच्या आयोजनासाठी विशेष प्रयत्न घेतले. तासगाव तालुक्यातून स्पर्धेला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादामुळे तालुक्यात बॅडमिंटन क्लब वाढीसाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे क्लबच्या वतीने सांगण्यात आले.

Leave a Comment

और पढ़ें