Search
Close this search box.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची २९९ वी जयंती उत्साहात साजरी, शेळ्या मेंढ्यांचे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी – अतुल काले

सांगली/तासगाव : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 299 व्या जयंतीचे औचित्य साधत मेंढपाळ आर्मी संघटना व पशुसंवर्धन विभाग तासगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शेळ्या- मेंढ्याना लसीकरण व आरोग्य तपासणी शिबिर धनगरवाडा तासगाव येथे संपन्न झाले. यावेळी सुमारे 400 हून अधिक मेंढ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून तासगाव तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात टप्प्याटप्प्याने आरोग्य शिबिरे राबविण्यात येणार असल्याची माहिती मेंढपाळ आर्मी प्रमुख अर्जुन थोरात यांनी दिली. पावसाळ्यात शेळ्या मेंढ्यांना होणाऱ्या आजारांपासून दूर ठेवण्यासाठी पावसाळापूर्व आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
शासनाच्या वतीने मेंढपाळांच्या साठी व शेळी मेंढी व्यवसायासाठी असणाऱ्या विविध योजनांची, संकेतस्थळांची माहिती त्याचबरोबर मेंढपाळ आणि पारंपारिकता बदलून आधुनिक पद्धतीने शेळी मेंढी पालन केल्यास मोठ्या प्रमाणावर उद्योजक तयार होऊन बेरोजगारी कमी होण्यास मदत मिळेल. मार्केटमध्ये शेळीचे दूध चांगल्या भावाने खरेदी कंपन्या उपलब्ध आहेत. या कंपन्याशी मेंढपाळ बंधूनी संपर्क साधल्यास दुधाला चांगला भाव मिळू शकेल अशी माहिती सांगली जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. थोरे यांनी दिली।
अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्ताने ऑनलाईन शेळी मेंढींची नोंदणी करण्याचे काम केंद्र शासनाने सुरु केले आहे. तासगाव येथील कुंडलिक शेंडगे यांच्या बकऱ्याला पहिला टॅग मारून या नोंदणीची सुरुवात करण्यात आली।
यावेळी पशुसंवर्धन विभाग मिरज चे सहाय्यक उपआयुक्त श्री. गवळी, तासगाव पशु संवर्धन विभागाच्या डॉ. चौगुले मॅडम, तासगावचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ प्रकाश पाटील, मेंढपाळ आर्मी संघटनेचे सचिव राहुल हजारे, सुधाकर गावडे, राजु ढाळे, पोपट भिसे, प्रताप एडके, महेश थोरात, सतिष वाघमोडे, धनाजी पांढरे, उत्तम जानकर, महादेव गावडे, ॲड. विनायक पाटील, मेंढपाळ बांधव तसेच समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते।

Leave a Comment

और पढ़ें