Search
Close this search box.

दिनेश मालुसरे यांचा सेवानिवृत्ती समारंभ संपन्न

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधि अतुल काले (सांगली/तासगांव)

सांगली/तासगांव (अतुल काले) : शासकीय आय टी आय तासगांव येथे जून 2016 पासून गणित, चित्रकला निदेशक म्हणून सेवा बजावलेले दिनेश दीनानाथ मालुसरे यांचा सेवानिवृत्त सत्कार ३१ मे रोजी तासगाव येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. त्यांनी 25 वर्ष सेवेचा प्रदीर्घ कार्यकाल पूर्ण केला. यावेळी प्राचार्य म. स. गुरव, किर्लोस्कर इबारा किर्लोस्कर वाडी चे ए के पुजारी, एम कॉन इंडस्ट्रीज तासगाव चे श्री भोसले साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
श्री. मालुसरे यांनी सामाजिक व अध्यात्मिक शेत्रात योगदान दिले आहे. सांगली महापूर, पाणी फाउंडेशन वॉटरकप 2018 मध्ये मध्ये त्यांनी उलेखनिय काम केले होते. त्यांनी केलेल्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील आठवणींना यावेळी उजाळा देण्यात आला तसेच त्यांनी वेळोवेळी रक्तदान करून समाजापुढे आदर्श ठेवला आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री कोळी सर यांनी तर आभार प्रदर्शन श्री मुजावर सर यांनी केले. या कार्यक्रम प्रसंगी तासगाव-कवठेमंकाळ तालुका शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख सचिन शेटे, संजय गांधी निराधार योजना समिती सदस्य शोभाताई पाटील, उद्योगपती रमेश आप्पा पाटील, प्रशांत पाटील, शेळके दादा, उमेश गायकवाड, श्री मालुसरे यांचा अकलूज येथील मित्रपरिवार, कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें