Search
Close this search box.

चिंदर सेवा संघाकडून गोल्ड मेडलिस्ट रेणू शेतसंदी सन्मानित…!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सिंधुदुर्ग-विवेक परब

जानेवारी 2024 रोजी घेण्यात आलेल्या ब्रेन डेव्हलपमेंट (बी. डी. एस) स्कॉलरशिप परीक्षेत गोल्ड मेडल सह राज्य गुणवत्ता यादीत झेप घेणा-या जिल्हा परिषद शाळा चिंदर कुंभारवाडीची विद्यार्थीनी कु. रेणू भीमाशंकर शेतसंदी हिच्या निवास्थानी जाऊन चिंदर सेवा संघाच्या वतीने चिंदर सेवा संघ अध्यक्ष प्रकाश मेस्त्री यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी चिंदर सेवा संघ खजिनदार गणेश गोगटे, कार्यवाह सिद्धेश गोलतकर, उपाध्यक्ष विवेक(राजू)परब, शिक्षक भीमाशंकर शेतसंदी आदी उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें