Search
Close this search box.

सुविद्या इन्स्टिट्यूटचे संस्थापक वसंत मेस्त्री यांचा स्मृतिदिन आनंदाश्रयच्या वृद्धांच्यासेवेत साजरा…!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सिंधुदुर्ग-विवेक परब

उद्योजक प्रकाश मेस्त्री यांनी जपले समाजभान

सुविद्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे (मुंबई) संस्थापक अध्यक्ष वसंत दिनकर मेस्त्री, मूळ चिंदर यांच्या प्रथम स्मृतिदिना
(तारखे नुसार) निमित्त आज अणावं. ता. कुडाळ येथील जीवन संजीवन सेवा ट्रस्ट आनंदाश्रय वृद्धाश्रमात वृद्धाना प्रकाश मेस्त्री आणि कुटुंबीय यांच्यावतीने उपयोगी वस्तू भेट देण्यात आल्या.
यावेळी सुविद्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे संचालक
प्रकाश मेस्त्री म्हणाले की आमचे बंधू वसंत मेस्त्री यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिंदर सारख्या ग्रामीण भागातून मुंबई सारख्या शहरात जाऊन शिक्षण क्षेत्रात गगन भरारी घेतली, सुविद्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सारखी शिक्षण संस्था बनवून हजारो विद्यार्थी घडवले. जे देशात परदेशात मोठया हुद्यावर काम करत आहेत. त्याच बरोबर जपला तो दातृत्व गुण. आणि आज त्याची आठवण म्हणून आम्ही ही आमच्या माता पित्यांनाच छोटीशी भेट देतो असे समजतो. यावेळी ओमकार आचरेकर, जितू तिरोडकर, आभार आनंदाश्रयच्या कोमल वर्धम यांनी मानले.

Leave a Comment

और पढ़ें